💥पुर्णेतील बुद्ध विहारात भाद्रपद पौर्णिमे निमित्त धम्मदेसना व सत्कार समारंभ संपन्न ........!


💥या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार विजय भांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती💥

पुर्णा ; येथील बुद्ध विहारात काल सोमवार दि.20 सप्टेंबर 2021 रोजी भदंत डॉ उपगुप्त महाथेरो भदंत पया वंश यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते . भदंत पयानंद, भदंत काश्यप थे रो, भदंत मुदितनंद , भदंत संघरत्न यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती.  प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार विजय भांबळे, समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, सामाजिक कार्यकर्ते आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन चे सदस्य सिद्धार्थ हत्तिं अंबीरे  यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, व सिद्धार्थ हत्ती अंबी रे यांनी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण मराठवाड्यामध्ये धम्मकार्य अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे. धम्मविषयक कार्यामध्ये सर्वोतपरी सहकार्य करण्याचे अभिवचन त्यांनी दिले.


यावेळी माजी आमदार विजय भांबळे यांनी महामानव तथागत भगवान बुध्द वभारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या मानवतावादी कार्यावर यथोचित प्रकाश टाकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून देशाची एकता व अखंडता मजबूत करण्याचं काम केल आहे. त्यांच्यामुळेच देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपती महिला होऊ शकल्या. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकला हे सर्व श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते.

पूर्णा शहरातील बुद्ध विहार आदर्श संस्कार केंद्र आहे विहाराच्या उर्वरित कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे अभिवचन त्यांनी दिले आपल्या प्रमुख धम्मदेशना मध्ये भदंत डॉ उप गुप्त महाथेरो भाद्रपद पौर्णिमेचे महत्व व मानवी जीवनामध्ये कुशल कर्माचे महत्त्व विशद केले कुशल कर्म सावली प्रमाणे आपल्या पाठोपाठ येत असते . कुशल कर्मामुळे सद्गगती प्राप्त होते.

कार्यक्रमास री.पा.ई  चे ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे, प्राचार्य मोहनराव मोरे नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे, नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड, मधुकर गायकवाड, माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी, पंचायत समितीचे सभापती बोकारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शहाजी देसाई,अखिल अहमद, धनगर टाकळी चे उपसरपंच शेरखान पठाण, आदींची उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमृतराव मोरे, टी झेड कांबळे, वा.रा. काळे, विजय बगाटे बाबराव वाघमारे एम.यू खंदारे  ज्ञानोबा जोंधळे बौद्धाचार्य त्रंबक कांबळे अतुल गवळी किशोर ढाक

 ढाकर्गे दिलीप गायकवाड, व महिला मंडळांनी परिश्रम घेतले बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांसाठी दिवंगत सूर्यकांत मारोती वाहुळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त  त्यांच्या कुटुंबियाकडून भोजन दान देण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या