💥अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा तात्काळ सरसकट पंचनामा करुन राज्यशासनाने हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या..!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी💥

परभणी - दोन दिवसापुर्वी परभणी जिल्हयामध्ये अतिवृष्टी झाली यामध्ये नदी, नाले, ओढे यांना पूर आला होता यामुळे पावसाचे पाणी शेतीमध्ये शिरुन पिकाचे अतोनात नुकसान झाले. जिल्हयातील हजारो हेक्टर उभे पिक असलेले जमीनी पाण्याखाली होत्या त्या शिवाय पावसाचे पाणी गावात शिरल्याने वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरले. जिल्हा व तालुक्याशी जोडणारे जवळपास सर्वच रस्ते पाण्याखाली होते. चालु हंगामातील ही दुसरी अतिवृष्टी असल्याने शेतकरी आर्थिक दृष्टया संकटात सापडला आहे. करिता शेतकऱ्यांना आर्थिक मदत व पीकविमा नुकसान तक्रारी नोंदणी बाबत खालील मागण्याचे निवड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी मॅडम यांना देण्यात आले.

💥निवेदनात खालील खालील मागण्या करण्यात आल्या आहेत ;-

१ ) अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ सरसकट पंचनामे करुन राज्य शासनाने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.

२ ) अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकाऱ्याचे बँकांनी पीककर्ज पुर्नगठण तात्काळ करावे.

३ ) पिक विमा कंपन्यांना पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार ७२ तासाच्या आत द्यावी लागते. परंतु पिकविमा कंपन्यांची वेबसाईड चालत नसल्याने व अतिवृष्टीत वाहतुकीचे रस्ते बंद असल्याने निर्धारीत वेळेत तक्रार करणे शक्य होत नाही . करीता पिकविमा कंपन्यांची ७२ तासाचा आवधी वाढवुन द्यावा व ऑफलाईन तक्रारी स्विकाराव्या.

४ ) ग्रामीण भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेक कुटूंबाचे आर्थिक नुकसान झाले शिवाय काही ठिकाणी घराची पडझड झाली याचा पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी.*

५ ) पुराच्या पाण्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांचे पशुधन वाहुन गेले व मृत पावले याचा पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी.*

मागण्या त्वरित मान्य करून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यावा असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, मीडिया प्रभारी नकुल होगे, लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वाकोडे, ओंकार खटिंग, वैभव संघई इत्यादींच्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या