💥धार रोडवरील अनाधिकृत कचरा डेपो स्थलांराबाबत कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीची प्रशासनाकडुन दखल💥

परभणी - दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा. आंचलजी गोयल मॅडम जिल्हाधिकारी परभणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात परभणी शहरातील नागरी वस्तीमध्ये महानगरपालिके मार्फत मागील २०-२५ वर्षापासुन अनाधिकृतपणे कचरा डेपो सुरु आहे. या कचरा डेपोला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांची परवानगी नसुन हा कचरा डेपो पुर्णपणे अनाधिकृत असुन सन २००७ ला परभणी शहर महानगरपालिकेला बोरवंड शिवारातील गट क्र . २६ येथे कचरा डेपो व प्रक्रिया करण्यासाठी परवानगी देण्यात आली परंतु महानगरपालिकेने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अनेक वेळा ठराव पास करुनही धार रोडवरील कचरा डेपो बोरवंड येथे स्थलांतरीत केलेला नाही. हा कचरा डेपो लात्काळ बंद करावा अशी मागणी करण्यात आली होती. याच निवेदनाची दखल घेत मा. जिल्हाधिकारी मॅडम यांच्या आदेशाने मा. जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका प्रशासन , जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांनी दि .२८ ऑगस्ट २०२१ रोजी मा.आयुक्त परभणी शहर महानगरपालिका, परभणी यांना पत्र पाठवून प्रहार जनशक्ती पक्षाने धार रोडवरील अनाधिकृत कचरा डेपो तात्काळ बोरवंड येथे स्थलांतरीत करण्याबाबत दिलेल्या निवेदनानुसार त्वरीत कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबत सूचना दिली आहे. 

यामुळे अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून परभणी शहर महानगरपालिका यावर काय कार्यवाही करते हे पाहणे महत्वाचे आहे. धार रोड वरील या अनाधिकृत कचरा डेपोमुळे परिसरामध्ये मोठया प्रमाणावर दुर्गंधी पसरली असुन वारंवार कचरा डेपोला आग लावल्यामुळे प्रचंड धुर निर्माण होत असुन शहरातील नागरीकांच्या व धार रोडवरुन ये - जा करणाऱ्या आठ ते दहा गावांचा नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. १५ दिवसाच्या आत हा अनधिकृत कचरा डेपो बोरवंड शिवारात स्थलांतरित झाला नाही तर तिव्र जन आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेला आहे. निवदेनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, मिडिया प्रभारी नकुल होगे, झरी सर्कल, प्रमुख शाम भोग , मंगेश वाकोडे , वैभव संघई, कैलास राष्ट्रकुट इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या