💥युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण यशवंत मुंडे यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते सत्कार...!


💥या यशाबद्दल डॉ.संतोष मुंडे यांनी यशवंतचा सहपरिवार सत्कार केला💥

परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)

              ग्रामीण भागातील युवकांनी यशवंत मुंडें सारख्या विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन मेहनतीने आत्मविश्वासाने परिक्षेस सामोरे जावे व यश प्राप्त करावे असे मत डॉ संतोष मुंडे यांनी युपीएससी परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलेल्या यशवंत मुंडे यांचा सत्कार करताना व्यक्त केले.


                 येथील यशवंत अभिमन्यू मुंडे या विद्यार्थ्याने युपीएससी परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात मोठे यश प्राप्त केले असून या यशाबद्दल डॉ. संतोष मुंडे यांनी सहपरिवार सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात डॉ संतोष मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्युनगंड न बाळगता आत्मविश्वासाने परिक्षेस बसले पाहिजे व मेहनतीच्या जोरावर परिक्षेस सामोरे गेले पाहिजे.यशवंतने पहिल्याच प्रयत्नात युपीएससी सारख्या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल त्याचे कौतुक आहे. यशवंत चा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली पाहिजे असे डॉ. मुंडे यावेळी म्हणाले. यशवंत मुंडे व वडील अभिमन्यू मुंडे, तसेच आई,बहीण यांचा यावेळी शाँल,श्रीफळ, मानाचा फेटा बांधून सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पांगरीचे उपसरपंच अँड.श्रीनिवास मुंडे, पत्रकार बालासाहेब फड, प्रा.प्रविण फुटके, विठ्ठल साखरे, महादेव गित्ते, प्रशांत सोनार, भागवत मुंडे, कांबळे सर, शुभम पुरभेय्य व इतर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या