💥गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये चैतन्य पाळवदे चे घवघवीत यश...!


💥या स्पर्धेसाठी चैतन्य यास त्याचे प्रशिक्षक अनिल मिरकर यांचे मार्गदर्शन लाभले💥

औरंगाबाद ; मागील महिन्यातील २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१  दरम्यान गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये चैतन्य दौलत पाळवदे याने ८१ किलो वजनी गटात व के-१ या फाइट प्रकारात कांस्य पदक मिळवत महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवरच पदक मिळवून दिला आहे.

या स्पर्धेसाठी चैतन्य याचे प्रशिक्षक अनिल मिरकर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व स्तरातून चैतन्य  चे अभिनंदन करण्यात आले तसेच मराठवाडा सांस्कृतिक मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालय औरंगबाद, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बुलढाणा, सर्व झोला ग्रामस्थ, कुटुंब व मित्रपरिवार या सर्वांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या