💥मंगरुळपीर नगर परिषदेची क्रमांक दोन ही शाळा बनली पार्कीग झोन आणी आंबटशौकीनांचा अड्डा..!


💥नगर परिषद प्रशासन आणी पोलिस विभाग याकडे लक्ष देईल का ?💥

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर शहरातील नामांकीत आणी ऊच्च शैक्षणिक दर्जा असलेल्या नगरपरिषद शाळा क्र.२ हे सध्या अवैध पार्कींग झोन बनले असुन खाजगी वाहनधारक या शाळेच्या आवारात वाहने ऊभी करतांना नेहमी दिसतात.तसेच काही आंबटशौकीन या शाळेचा गैरमार्गासाठी वापर करत असुन शाळेच्या शैक्षणीक पविञतेच्या ठिकाणाला काळीमा फासत असल्याचा प्रकार दिसतो. सर्व प्रकार त्या शाळेला गेट नसल्यामुळे होत असल्याचे चिञ आहे.सध्या कोरोणाच्या पार्श्वभुमीवर शाळा जरी बंद असल्या तरी शालेय कामकाज सुरु असते.विकासाच्या बाता मारणार्‍या नगरपरिषदेच्या कर्मचारी आणी पदाधिकार्‍यांना हा बोभाटा दिसत नाही की हेतुपुरस्सर ते कानाडोळा करत आहेत हे कळायला शहरवाशीयांना मार्ग नसल्याचे कळते.पोलिस प्रशासनाने हा प्रश्न तातडिने सोडवुन सबंधित विभागाने शाळेला गेट बसवावे अशी मागणी आता जोर धरत आहे.


प्रतिनिधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या