💥परभणी जिल्ह्यातील सेलू येथील निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सूरू.....!

💥दुधना नदी या पाण्याने दुथडी भरून वाहत असून मोरेगाव नजीक जुन्या पुलावरून दुधना नदीचे पाणी वाहत आहे💥

परभणी (दि.०५ सप्टेंबर) - जिल्ह्यातील सेलू येथील निम्न दुधना प्रकल्पातून पाटबंधारे खात्याने आज रविवार दि.०५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळ पासून दुधना नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू केला आहे दरम्यान दुधना नदी या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्या मुळे अक्षरशः दुथडी भरून वाहत असून मोरेगाव नजीक जुन्या पुलावरून दुधना नदीचे पाणी वाहत आहे.

या जलाशय पाणीपातळी 426.300  मीटर पाणी असून जलाशयात जीवंत साठा टक्केवारी 98.81%ऐवढी आहे आज रविवारी सकाळी 8.30 वाजता निम्न दुधना प्रकल्पाचे द्वार क्र. 1, 2, 3, 4, 17, 18, 19 व 20 हे आठ दरवाजे* 0.30 मीटरने वाढवून 0.60 मीटरने उघडण्यात येणार आले.

सद्यस्थितीत प्रकल्पाचे द्वार क्र. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 14, 15, 16, 17, 18, 19 व 20 हे चौदा दरवाजे 0.30 मीटरने  उचलण्यात आले असून नदीपात्रात= 1087×14= 15218 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे, त्यात वाढ होऊन एकूण= 2160×8 + 1087×6= 23802 क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे.असे आवाहननिम्न दुधना प्रकल्प, पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या