💥मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या भावी सहकारी या वक्तव्यानं महाराष्ट्रात उडाली एकच खळबळ....!


💥राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ; शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याचेच संकेत मुख्यमंत्र्यानी दिल्याची चर्चा सुरू💥

✍️मोहन चौकेकर

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  शुक्रवारी औरंगाबादच्या  दौऱ्यावर आले होते . मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उचावल्या असून शिवसेना-भाजपची पुन्हा युती  होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याचेच संकेत मुख्यमंत्र्यानी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते . या कार्यक्रमाला एकाच मंचावर सर्वपक्षीय नेते उपस्थित असताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून टोलेबाजी केली. मात्र, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलं. आहे. ‘माजी सहकारी आणि भविष्यातील सहकाऱ्यांचं स्वागत’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना-भाजपची युती होणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ?

‘व्यासपीठावरचे माझे आजी माजी सहकारी, आणि भविष्यात पुढं पुन्हा एकत्र आले तर भविष्यातील सहकारी या सगळ्यांचे स्वागत’, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यावेळी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेत असाल तर सरकार तुमच्यासोबत असल्याचा शब्द देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी रावसाहेब दानवे यांना दिला. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याचेच संकेत मुख्यमंत्र्यानी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या