💥पुर्णेतील डॉ.आरती गणेश सुर्यवंशी या कर्तृत्ववान लेकीने माता-पित्यासह केले समाजाचेही नावलौकिक...!


💥डॉ.आरती सुर्यवंशी बनली आदीवासी कोळी समाजातील पहिली एम.बी.बी.एस स्त्रीरोग तज्ञ गायनौलाजिस्ट💥

पुर्णा ; येथील आदीवासी कोळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेश सुर्यवंशी यांची तृतीय कन्या डॉ.आरती गणेश सुर्यवंशी या कर्तृत्ववान लेकीने आपल्या कर्तृत्वाने आपल्या माता-पित्यासह ज्या समाजात जन्म घेतला त्या आदीवासी कोळी समाजासह पुर्णा तालुक्याचेही नावलौकिक केले असून सर्वसाधारण कुटुंबात जन्म घेतलेल्या कर्तृत्ववान आरती सुर्यवंशी हिने अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करीत पाहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण शहरातील नामांकीत शिक्षण संस्था विद्या प्रसारनी शाळेत घेतले तर अकरावी बारावी सायन्स कॉलेज नांदेड येथे शिक्षण घेतले व त्याच परिस्थितीत या कर्तृत्ववान लेकीचा वैद्यकीय शिक्षण (एम.बी.बी.एस) साठी सोलापूर येथील वैशमपायन मेडिकल कॉलेजला नंबर लागला व सहा वर्षे एम.बी.बी.एसचे शिक्षण पूर्ण केले आणि अतिशय मेहनती नंतर डॉ.आरतीचा एम.एस डीग्री साठी नागपूर येथे नंबर लागला यानंतर बुध्दीमत्ता व मेहनतीच्या बळावर डॉ.आरती सुर्यवंशी स्त्रीरोग तज्ञ गायनौलाजिस्ट डॉक्टर बनली पूर्णेतील आदिवासी कोळी महादेव समाजातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान डॉ.आरती सुर्यवंशीने मिळवला तिच्या या कर्तृत्वामुळे डॉ.आरतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


पुर्णा शहरातील आदीवासी महादेव कोळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व डॉ.आरतीचे वडील गणेश सुर्यवंशी हे साधी राहणी उच्च विचार व शुन्यातून पुढे आलेले मनमिळाऊ सामाजिक कार्यकर्ते असून त्यांच्या या कर्तृत्ववान लेकीने त्यांच्यासह समाजाचेही ! नावलौकिक केले.डॉ.आरतीसह तिचे वडील गणेश सुर्यवंशी यांच्या कर्तृत्वाला मानाचा त्रिवार मुजरा......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या