💥प्रा.धाराशिव शिराळे शैक्षणिक कार्याचा अनुकरणीय आदर्श डॉ गोविंद नांदेडे यांचे प्रतिपादन....!


💥राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार २०२० प्रा.धाराशिव शिराळे यांना प्रदान करताना ते बोलत होते💥

शमीम पठाण  (दि.11 सप्टेंबर)

प्रा.धाराशिव शिराळे हे शिक्षण क्षेत्रातील असाधारण शैक्षणिक कार्याचे  एक  अनुकरणीय आदर्श  असल्याचे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी प्रतिपादन केले आहे. राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार २०२० प्रा.धाराशिव शिराळे यांना प्रदान करताना ते बोलत होते . मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईच्या वतीने प्रा.शिराळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . त्या प्रसंगी ते बोलत होते प्रा.शिराळे यांच्या शिक्षण क्षेत्रातील असाधारण कार्याचा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या मार्फत राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ नांदेडे याप्रसंगी बोलताना पुढे म्हणाले , प्रा.धाराशिव शिराळे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक चिंतनशील प्रयोग केलेले आहेत . त्यांनी विद्यार्थी  शिकण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी बहुविध शैक्षणिक साहित्याचे संशोधन आणि निर्माण केलेले आहे त्यांच्या या संशोधित शैक्षणिक साहित्याचा विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक सुलभ आणि पक्के होण्यासाठी खूप लाभ झाला आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले प्रा.शिराळे शिक्षण शास्त्रातील उच्च अर्हताधारक असून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील केलेले कार्य इतर शिक्षकांना अनुकरणीय असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 

त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची पावती असल्याचे चौधरी म्हणाले.ज्ञानाचा कठीण आशय प्रत्येक विद्यार्थ्यास सुलभपणे आकलन झाल्यास  विद्यार्थ्यांना शिकण्यात अभिरुची निर्माण होते . त्यामुळे विद्यार्थी सक्षम, जीवन जगण्यास सामर्थ्यशाली होतात असे प्रा.शिराळे यांनी आपल्या सन्मानास उत्तर देताना सांगितले...पवित्र वस्त्र , सन्मान चिन्ह , सन्मान पदक आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर कुमार आनंदगावकर यांनी व्यक्त केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या