💥परभणी संघ पुन्हा चॅम्पियन; जिल्ह्यात खेळाडूंमध्ये उत्कृष्ट प्रतिभा - जुनैद खान दुर्रानी


💥परभणी संघाच्या संघ प्रशिक्षकपदी वहाब खान पठाण तर संघ व्यवस्थापक पदी सय्यद मुस्तफा जाफर होते💥


किरण घुंबरे पाटील

पाथरी:-टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सय्यद पिंपरी, नाशिक येथे राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा दिनांक २३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र चे सचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली आपल्या जिल्ह्यातील खेळाडू मध्ये प्रतिभा असून भविष्यात निश्चित उत्तमोत्तम खेळाडू आपल्या प्रतिभेने जिल्ह्याचे नाव राज्य राष्ट्रीय पातळी सह जागतिक स्तरावर नेतील अशी प्रतिक्रीया पाथरी न प चे गट नेते तथा टेनिस क्रिकेट संघटनेचे जिल्हाध्यक्ष जुनेद खान दुर्रानी यांनी बोलतांना व्यक्त केली.


परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जुनेद खान दुर्रानी यांच्या अध्यक्षते खाली निवड झालेला परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन चा चमू संघटनेचे सचिव शेख मुजीब यांच्या निरीक्षणात २३ सप्टेंबर रोजी नाशिक येथे पोहोचला स्पर्धेच्या सुरुवातीस  साखळी सामन्यां मध्ये जालना, सिंधुदुर्ग ग्रामीण, नाशिक सिटी, बीड सिटी, गोंदिया या संघांना पराभूत करून परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन संघाने आपल्या ' ए ' पोलमध्ये पोल टॉप केले. त्यानंतर कॉटर  फायनल मध्ये प्रवेश केला. कॉटर फायनल च्या सामन्यांमध्ये नाशिक ग्रामीण संघाला हरवून परभणी संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. सेमी फायनल सामन्यात पालघर संघाला हरवून परभणी संघ अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम फेरीमध्ये परभणी संघाचा सामना सिंधुदुर्ग संघासोबत झाला. सिंधुदुर्ग संघाला एक तर्फी हरवून परभणी संघाने राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा सलग दुसऱ्यांदा आपल्या नावे केली. 

उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक इम्रान खान जिंतुरकर, मालिकावीर पारितोषिक मोहम्मद आमेर यांना मिळाले विजयी संघामध्ये कर्णधार शेख अमन, मोहम्मद युसुफ, शेख सोहेल, इमरान खान, अब्दुल खिझर, शेख इनायत, शुभम भदर्गे, मोहम्मद आमेर, अदनान खान, मुश्ताक कुरेशी, शंकर धावारे, आमेर अंसारी, अदनान सलीम खान, श्रीनाथ कारकर, वासिक अन्सारी, कृष्णा मोकाशे आदी खेळाडूंचा समावेश होता. 

  💥परभणी संघाच्या संघ प्रशिक्षकपदी वहाब खान पठाण तर संघ व्यवस्थापक पदी सय्यद मुस्तफा जाफर होते ;-

          परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन संघाच्या या विजयाबद्दल सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून विशेषतः आमदार बाबाजानी दुर्रानी, जुनैद खान दुर्रानी, अनिलराव नखाते, दादासाहेब टेंगसे, चक्रधर उगले, सदाशिव थोरात, राविकॉ तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील,शेख जावेद, मुकेश राठोड, शेख मुजीब, इमरोज खान, तुकाराम साळुंके, आदींनी शुभेच्छा दिल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या