💥आमदार अंबादास दानवे यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा आढावा....!


💥यात समाजकल्याण विभागअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला💥

 ✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर/औरंगाबाद : शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेची  आढावा बैठक घेण्यात आली बैठकीत विविध विभागाअंतर्गत होणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा आ.अंबादास दानवे यांनी घेतला. 

यात समाजकल्याण विभागअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला तसेच आपत्तीग्रस्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांची लागण झालेली आहे त्याचे व्यवस्थित रित्या पंचनामे करून शासनाकडे पाठवण्याचे सूचना पशुसंवर्धन खात्यातील अधिकारी यांना देण्यात आल्या.गावांमध्ये स्वच्छता व ठीकठिकाणी सार्वजनिक शौचालय असणे गरजेचे आहे यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या तसेच पाणी पुरवठा योजनेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावे तसेच विकासकामांत दिरंगाई न होता कामांना गती देऊन वेळेवर पूर्ण करावीत व कामाचा दर्जा उच्च प्रतीचा असला पहीजे यावर विशेष लक्ष देणे याबाबत सूचना करण्यात आल्या यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मिनाताई शेळके,जिल्हापरिषद सीईओ निलेश गटाने , समाज कल्याण सभापती मोनाली राठोड , शिक्षण आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे  ,आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके,शिक्षण अधिकारी देशमुख साहेब,माध्यमिक शिक्षण अधिकारी बी बी चव्हाण,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी माने मॅडम,लेखा वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे ,कार्यकारी अभियंता अजित वाघमारे उपजिल्हाप्रमुख राजू राठोड तालुकाप्रमुख केतन काजे आदी उपस्थित होते.

यावेळी आ अंबादास दानवे यांनी सुविधायुक्त ग्रामपंचायत कार्यालये,शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या हेतूने जी. प.शाळा, व सुविधापूर्ण स्मशानभूमी यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या