💥बीड जिल्हा मंडप असोसिएशनच्या अध्यक्षपदी विकास शिंदे तर उपाध्यक्ष रोहिदास सातपुते यांची निवड...!


💥पदग्रहण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन तिरूपती मंगल कार्यालय केज येथे करण्यात आले होते💥

आँल इंडिया टेन्ट डिलर वेलफेअर आँर्गनाईझेशन व आँल महाराष्ट्र टेन्ट डिलर वेलफेअर आँर्गनाईझेशन सलग्न बीड जिल्हा मंडप वेलफेअर असोसिएशन सलग्न केज तालुका मंडप असोसिएशन द्वारा आयोजित सदस्य नोंदणी चर्चासत्र व बीड जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन तिरूपती मंगल कार्यालय केज येथे दिनांक 22/09/2021 रोजी आयोजित करण्यात आले होते

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बीड जिल्हा मंडप वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. विकासराव शिंदे हे होते यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा ची नुतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे स्थापन करण्यात आली बीड जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. रोहिदास सातपुते,  मा.श्री. रितेश बजगुडे, बीड जिल्हा सचिव मा.श्री. राहुल सावंत , बीड जिल्हा कार्यध्यक्ष मा.श्री. महादेव जाधव, बीड जिल्हा सहसचिव मा.श्री. महेश्वरआप्पा चिल्लरगे, बीड जिल्हा कोषाध्यक्ष मा.श्री. अतुल बेंडे, बीड जिल्हा संघटक मा.श्री. आकाश संचेती, बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मा.श्री. तांबोळी आजम , बीड जिल्हा सहकार्यध्यक्ष मा.श्री. जगदीश साखरे, बीड जिल्हा सहकार्यध्यक्ष मा.श्री. सतिश जायभाये, बीड जिल्हा सहकोषध्यक्ष मा.श्री. अशोक तट, बीड जिल्हा सहसंघटक मा.श्री. हर्षवर्धन वडमारे, मा.श्री. राजेश झांबरे, बीड जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख मा.श्री. किशोर मावसकर, बीड जिल्हा प्रमुख सल्लागार मा.श्री. दत्ता ढवळे, मा.श्री. जमील काझी, मा.श्री.गणेश खेडकर, मा.श्री. अशोक ढाकणे , मा.श्री. अभिमान शिंदे मा.श्री. प्रेम गायकवाड , मा.श्री. नागेश गोल्हार यदि यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला अंबेजोगाई तालुका मंडप असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. दत्ता सावरे , परळी वै तालुका मंडप असोसिएशन चे उपाध्यक्ष मा.श्री शिवकुमार नाडार, कोषाध्यक्ष मा.श्री. स्वप्नील सावजी, सहसचिव मा.श्री. उमेश म्हेत्रजकर व केज मधील सर्व मंडप व्यवसायिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के कांबळे सर तर आभार प्रदर्शन तांबोळी यांनी केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या