💥डव्हा फाटा नजीक ट्रक व मोटरसायकल अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार'; पोलीस घटनास्थळी दाखल...!


💥ग्रामस्थांचा पंचनामा होईपर्यंत रास्तारोको💥

फुलचंद भगत


वाशिम:-नागपूर औरंगाबाद महामार्गावरील पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डहा फाटा नजीक आज दि 26 सप्टेंबरला दुपारी एक वाजता दरम्यान ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघात होऊन अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली, असून  पंचनामा होईपर्यंत खिर्डावाशी यांनी रस्ता रोको करण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार खिर्डा येथील दिगंबर लक्ष्मण लठाड वय 32 शेतमजूर हा आपल्या मुलासह मालेगाव वरून  खिर्डा येथे  MH 30 M 3890 या दुचाकीने घरी येत होता शेलुबाजार वरून मालेगाव कडे  भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक   MH 34 BG  2788 ने डव्हा फाटा नजीक मालेगाव कडून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला . मृतक हा खिर्डा  येथील दिगंबर लठाड  32 शेतमजूर असल्याचे समजते जउळका पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आजिनाथ मोरे सह हेड कॉन्स्टेबल सचिन कल्ले व कर्मचारी वृंद घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतकाच शव पोस्टमार्टम करता पाठवण्यात आले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली वृत्त लिहीपर्यंत पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या