💥परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करुन सरसगट शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत जाहिर करा....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी💥


परभणी -  जिल्हयामध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे. दि . २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यानच्या पावसामुळे शेतीमध्ये दोन से तीन फुटापर्यंत पाणी साचले असून काढणीसाठी आलेल्या सोयाबीनच्या शेंगांना जागेवरच मोड फुटले आहे. शेतीची परिस्थिती अतिशय गंभीर असून शेतकरी हा आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. जी परिस्थिती सोयाबीन पिकाची आहे तशीच परिस्थिती कापूस , तूर, ऊस व केळी या पिकांची पण आहे . दि. २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यानच्या पावसासोबत वादळी वारा सुटल्याने ऊस व केळी जागेवर आडव्या झाल्या आहेत . झालेले नुकसान भरुन येण्यापलिकडचे आहे . करीता आपण माय - बाप सरकारने शेतकऱ्यांचे झालेले पिकाचे व आर्थिक नुकसान पाहता परभणी जिल्हयात ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकप्लांसाठी सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत जाहिर करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मा. जिल्हाधिकारी मॅडम यांची भेट घेऊन निवेदनाची प्रत त्यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आली आहे.


या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे पशुधनही वाहुन गेले आहेत तसेच मोठ्या प्रमाणावर घरांची पडझाडही झाली आहे. या सर्वांना पंचनामे करून राज्य शासनाच्या वतीने योग्य ती आर्थिक मदत करावी. या वर्षीच्या चालू पावसाळ्यात परभणी जिल्हयाल पाच वेळा अतिवृष्टी झाली आहे . करीला ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकन्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत राज्य शासनाने द्यावी असे ही या निवेदनात म्हंटले आहे

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बांधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, मिडिया प्रभारी नकुल होगे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख  ज्ञानेश्वर पंढरकर, लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वाकोडे, झरी सर्कल प्रमुख शाम भोंग, युवा आघाडी लोहगाव सर्कल प्रमुख ओंकार खटिंग, रामेश्वर जाधव इत्यादींच्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या