💥परभणी जिल्ह्यातील पाथरी-नरसिंह पोखर्णी मार्गावर केकरजवळ्या जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जन जागीच ठार...!


💥या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन गंभीर जखमी💥

परभणी ; जिल्ह्यातील पाथरी-नसिंह पोखर्णी या मार्गावर केकरजवळा शिवारात आज रविवार दि.१२ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन व्यक्ती जागीच ठार तर अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

पाथरी-पोखर्णी मार्गावरून पाथरीकडे जाणाऱ्या अज्ञात वाहन रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या ग्रामस्थांना धडक देवून सुसाट वेगाने पुढे निघून गेले या अपघातात दोन व्यक्ती जागीच मृत्युमुखी पडल्या तार दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्या अज्ञात वाहनाचा पत्ता लागला नाही.   

पहाटेच्या सुमारास पोलिस पाटील उत्तमराव लाडाणे, आत्माराम लाडाणे, नंदकिशोर लाडाणे, राधाकिशन लाडाणे पाथरी पोखर्णी रोडवर मॉर्निंग वॉक करत असताना पोखर्णीहुन पाथरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने या चारही जणाना धडक दिली. यात उत्तमराव लाडाणे व आत्माराम लाडाणे यांचा जागीच मृत्यू झाला तर नंदकिशोर लाडाणे व राधाकिशन लाडाणे यांच्यावर परभणी येथे उपचार चालू आहेत.

मानवत पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्या वाहनाचा पोलिसांनी शोध सूरू केला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या