💥ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी व धुर फवारणी तात्काळ करा....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कडे मागणी💥

परभणी - जिल्हयामध्ये ग्रामीण भागामध्ये सध्या डेंग्यू, मलेरिया, चिकन गूनिया चे रुग्ण मोठया आढळुन येत असुन ग्रामीण भागामध्ये ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या शिवाय सर्दी, खोकल्ला व ताप अशा आजाराने थैमान घातले आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग मात्र संत गतीने कार्य करीत आहे. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्यानेच ग्रामीण भागातील रुग्ण शहराकडे धाव घेत आहेत  अश्या रुग्णांना गावातच किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार मिळावेत. वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हयातील प्रत्येक गावामध्ये धुर फवारणी व घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणे तसेच प्रथमोपचार करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागामार्फत तात्काळ जिल्हयातील ग्रामीण भागातील प्रत्येक गाव तांडयावर जाऊन धुर फवारणी करावी तसेच घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करुन प्रथमोचार करणे बाबत आरोग्य विभागाला सूचना द्याव्यात या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्ट मंडळाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शिवानंद टाकसाळे यांची भेट त्यांना देण्यात आले.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बाळासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, मीडिया प्रभारी नकुल होगे, लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वाकोडे, झरी सर्कल प्रमुख शाम भोंग इत्यादी च्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या