💥वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या डव्हा गावात वृद्ध दांपत्याची निर्घृण हत्या....!


💥हत्या झालेले वृद्ध दाम्पत्य चाका तीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होते💥


वाशिम: वाशिम जिल्ह्याच्या डव्हा येथील गजानन निंबाळकर वय 60 आणि निर्मला निंबाळकर वय 55 वर्षे  हे वृद्ध दाम्पत्य चाका तीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होते. त्यांची हत्या झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास उघडकिस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या वृद्ध दाम्पत्याची हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली याचा शोध घेणं पोलिसांसमोर आवाहान असणार आहे. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जऊळका पोलीस श्वान पथकाच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या