💥दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, परळीची निट परिक्षा केंद्र म्हणून निवड.....!


💥रविवार दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी होणार निट परिक्षा💥

देश पातळीवर मेडिकल प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या National Eligibility Cum Entrance Test (NEET) परिक्षा केंद्रासाठी परळी वैजनाथ येथील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, तळेगाव, परळी - बीड हायवे, ता. परळी वैजनाथ, जि. बीड या शाळेची निवड करण्यात आली आहे. संपुर्ण देशात निट परिक्षेसाठी 198 शहरांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये परळी वैजनाथ शहराचा समावेश आहे.


केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालया अंतर्गत नेशनल टेस्टींग एजन्सी द्वारे दरवर्षी एमबीबीएस व बिडीएस कोर्सेसना प्रवेशासाठी निट परिक्षा घेतली जाते. परिक्षेची रचना सिबीएसई कडून केली जाते तर प्रत्यक्ष परिक्षा घेण्याची जबाबदारी नेशनल टेस्टींग एजन्सी ची असते. निट परिक्षा ७२० गुणांची असते. भौतिक शास्त्र १८० गुण, रसायन शास्त्र १८० गुण तर जैविक शास्त्र ३६० गुण असे वर्गीकरण असते. बीनचूक उत्तरास ४ गुण मिळतात तर चूक उत्तरास १ गुण वजा केला जातो.

“दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची आधुनिक इमारत व सुविधा लक्षात घेता सध्या करोना परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यास सुरक्षित व सोयीचे होणार आहे” असा विश्वास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषा किरण गित्ते यांनी व्यक्त केला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या