💥केंद्र सरकार कडून सक्त वसुली संचालनाच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न...!


💥अशी टीका ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली आहे💥

पुणे : केंद्र सरकारची सक्त वसुली संचालनालय (ई.डी.) ही यंत्रणा कोणाच्या मागे कधी लागेल हे सांगता येत नाही विरोधकांना नाउमेद करण्यासाठी या यंत्रणेचा साधन म्हणून वापर केला जात आहे ई.डी.कडून नाहक त्रास देण्याचा प्रकार सध्या सुरू आहे अशी टीका ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली. 

काही ठरावीक लोकांच्या हातात कायदा देऊन सहकार क्षेत्र संपविण्याचा घाट घातला जात आहे असेही त्यांनी सांगितले हडपसर येथील एका नागरी बँके च्या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ई.डी.च्या मुद्दय़ावरून त्यांनी केंद्र सरकावर टीका केली ई.डी.ची कारवाई म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे ही यंत्रणा कधी कोणाच्या मागे कशी लागेल हे सांगता येत नाही असे सांगून पवार म्हणाले की, संस्थांमधील गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ई.डी.कडून केले जाते मात्र अलीकडे या यंत्रणेचा वापर विरोधकांना नाउमेद करण्यासाठी केला जात आहे संबंधित संस्थेमध्ये ई.डी. हस्तक्षेप करत आहे.

 एकनाथ खडसे, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक,भावना गवळी अशा अनेक नेत्यांची ई.डी.मार्फत चौकशी सुरू आहे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर चौकशी सुरू असल्याचे माझ्या ऐकिवात किंवा पाहण्यात नव्हते राज्याच्या अधिकारांवर गदा येत असल्याने पुढील अधिवेशात हा विषय एकत्रिपपणे मांडण्याचा प्रयत्न केला जाईल नागरी सहकारी बँकांच्या धोरणाबाबतही पवार यांनी टीका केली रिझव्‍‌र्ह बँकेचे नागरी सहकारी बँकांबाबतचे धोरण पाहिले तर या प्रकारच्या बँका बंद पडण्याची भीती आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या