💥नागपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी धाडीत वाघाचे अवयव जप्त आतापर्यंत २९ आरोपींना अटक....!


💥मागील वर्षी दिवाळीत वीजप्रवाह सोडून वाघ मारल्याची कबुली या अटके तील शिकाऱ्यांनी दिली💥

नागपूर : राज्याच्या वनखात्याने मागील महिनाभरापासून वाघांच्या शिकाऱ्यांच्या अटकेचे सत्र सुरू केले असून आतापर्यंत २९ आरोपींना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे एक विशेष पथक तयार करून दोन ठिकाणी धाडी टाकून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले मागील वर्षी दिवाळीत वीजप्रवाह सोडून वाघ मारल्याची कबुली या अटके तील शिकाऱ्यांनी दिली. 

वाघांच्या शिकाऱ्यांच्या शोधासाठी तयार करण्यात आलेल्या पथकाने मौजा सीतापूर(गोंदी) येथील आरोपी राजकुमार मरकाम व कमलसिंह भलावी यांना ताब्यात घेतले त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर वाघाचे एक नख आणि हाडांचे तीन तुकडे जप्त करण्यात आले या दोन्ही आरोपींना रामटेक येथील मे.प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी १६ सप्टेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. 

पहाटे पाच वाजता करण्यात आलेल्या या कारवाईनंतर रात्री याच पथकाने बुटीबोरी वनपरिक्षेत्रातील चंद्रपूर-नागपूर महामार्गावर बोरखेडी टोल नाका येथे सहा नखे, १३ वाघांच्या मिशांसह तीन आरोपींना ताब्यात घेतले नागपूर येथे वाघांच्या अवयवांची तस्करी होत असल्याची माहिती वनखात्याला मिळाल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांनी आरोपींना पकडण्यासाठी बोरखेडी टोलनाका येथे सापळा रचला. 

यावेळी रामचंद्र बावणे, योगेश तोडासे व श्रीराम पोरेते यांची तपासणी केली असता आणखी सूत्रे हाती लागली बुटीबोरी प्रादेशिक विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या नेतृत्वात पथक तयार करून रात्रीच ते चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले यात आणखी दोन आरोपी व वाघाची अंदाजे चार किलो हाडे, मिशा, दात आदी अवयव जप्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या