💥परभणी जिल्ह्यात शासकीय स्वस्त धान्याचा होणारा काळा कारभार थांबणार तरी केव्हा ?


💥गंगाखेड-पालम राज्यमार्गावर केरवाडी शिवारात महामार्ग पोलिस पथकाने पकडला शासकीय स्वस्त धान्याचा मोठा साठा💥

परभणी ; जिल्ह्यात दारिद्रय रेषेखालील गोरगरीब रोजमजूर तसेच निराधार अपंगांना शासनाकडून पुरवला जाणाऱ्या शासकीय स्वस्त धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून या शासकीय स्वस्त धान्याच्या काळ्या कारभारात स्थानिक पातळीवरील महसूल पुरवठा विभागातील भ्रष्ट झारीतील शुक्राचार्यांचे पाठबळ मिळत असल्यामुळे जिल्ह्यात शासकीय स्वस्त धान्य माफियांची हिंमत कमालीची वाढल्याचे दिसत असून जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर तरी या शासकीय स्वस्त धान्याच्या काळ्याकारभाराला लगाम लागेल अशी आशा व्यक्त केली जात होती परंतु शासकीय स्वस्त धान्याचा हा काळाकारभार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून  गंगाखेड-पालम या राज्यमार्गावर केरवाडी शिवारात महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या एका पथकाने काल बूधवार दि.०१ सप्टेंबर २०२१ रोजी पकडलेल्या एका ट्रकमधून स्वस्त धान्य दुकानातून काळ्याबाजारात जाणाऱ्या गव्हाचा मोठा साठा जप्त केला आहे.


दरम्यान या कारवाईत ६१९ गव्हाचे कट्टे अंदाजे किंमत ७ लाख ७६ हजार ९०२ रुपये व ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे वाहन बुधवारी दुपारी पेट्रोलिंग करीत होते, त्यावेळी गंगाखेड ते पालम या राज्यमार्गावर केरवाडी शिवारात या पथकास एम.एच. २६-एडी.६४८८ या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने जाताना आढळला. या पथकाने ट्रकचालकास ट्रक थांबविण्याचा इशारा केला, परंतु ट्रक चालक वेगाने पुढे निघाला, या पथकाने अर्धा किलोमीटर पाठलाग करीत तो ट्रक थांबला,चौकशी सुरू केली. तेव्हा ट्रक चालकाने व क्लिनर ने उडवाउडवीची उत्तरे दिली. या पथकाने संशयाने ट्रक मधील मालाची तपासणी केली, तेव्हा गव्हाचा मोठा साठा ट्रक मध्ये आढळून आला.

 पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्चना कुरकुटे, नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे, एएसआय कातकडे, टाकरस,पोलीस नाईक संजय पुरी व  श्याम काळे यांच्या पथकाने केलेल्या पाहणीतून तो साठा स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या गव्हाचा असल्याचा संशय आल्यानंतर ट्रक चालक व क्लिनर यांना विश्वासात घेतले. तेव्हा त्या दोघांनी गव्हाचा तो साठा गंगाखेड येथील आशिष ट्रेडिंग कंपनी येथून भरला असल्याचे व हैदराबाद परिसरातील सुप्रीम ऍग्रो आटा मिल यांच्याकडे तो उतरविण्यात करता नेत असल्याचे नमूद केले.

या ट्रकमध्ये गव्हाची ६१९ कट्टे ३५४७५ किलो ग्रॅम,अंदाजे किंमत ७ लाख ७६ हजार ९०२ रुपये साठा आढळून आला. महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या या पथकाने ट्रक चालक मोहम्मद गौस मोहम्मद याखूब राहणार नांदेड व क्लिनर आयुब खान सुभान खान या दोघांना व मालासह  ट्रक पालम पोलिसांच्या स्वाधीन केला आहे पोलीस अधिक्षक डॉ.जमादार उप अधिक्षक डॉ.टिपरसे ,पोलीस निरिक्षक केंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अर्चना करपुडे ,पोउपनि प्रकाश कुकडे एएसआय.कातकडे  पोहेकॉ टाकरस,पोलिस नाईक संजय पुरी ,शाम काळे यांनी केलेल्या या कार्यवाहीने खळबळ उडाली आहे.

 दरम्यान स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणारा गव्हाचा साठा काळ्याबाजारात जाताना पुन्हा पकडले गेल्याने गंगाखेड व पालम तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.यापूर्वीही गंगाखेड येथील गोदामात तसेच वाहनात बेकायदेशीरपणे गव्हाचा मोठा साठा आढळून आला होता यात एक मोठे रॅकेट कार्यरत आहे काही व्यापारी गुंतले आहेत जिल्हा महसूल प्रशासनाने गव्हाचा काळाबाजार करणाऱ्या या साखळी विरोधात कठोर भूमिका घ्यावी असा सूर व्यक्त होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या