💥मंगरुळपीर येथे विहिरीत बुडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू....!


💥पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे💥

फुलचंद भगत -

मंगरुळपीर:- विहिरीत बुडून शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना जांब रोड येथील शेतात काल सोमवार दि. २० रोजी घडली असून पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अनुप गजानन राठोड वय २१,रा नवीन सोनखास यांनी ता २१ रोजी तक्रार दिली की,गजानन   काळुराम राठोड वय ४५ रा नवीन सोनखास हे दिव्यांग असून ता २० रोजी ते दुचाकी व काठी घेऊन घरून निघून गेले.परंतु जांब रोडवरील शेतातील विहिरीजवळ त्यांची दुचाकी व काठी दिसल्याने  शोध घेतला असता प्रेत मिळाले.अशा तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या