💥भिम मर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज पठाण यांना जिवे मारण्याची धमकी...!

💥आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा भीम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन - प्रा.मास्टर अनिल कांबळे

औरंगाबाद ; भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज पठाण यांच्या श्रीरामपूर येथील घरी जाऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली शनिवार दि.११ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ८-०० वाजता हा प्रकार घडला सदर घटनेचा निषेध म्हणून भीम गर्जना सामाजिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे रितसर निवेदन देऊन फिरोज पठाण यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात लोकांना त्वरित अटक करा अशी मागणी केली.


भिम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज पठाण व त्यांच्या पत्नी घरी नसताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांपाशी फिरोज पठाण यांना जीवे मारण्याची धमकी दिली बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भीम गर्जना सामाजिक संघटना काय चालवतो मोठे भाषण काय करतो तुझ्या वडिलांना समजून सांग नाहीतर आम्ही त्यांना जीवे ठार मारू अशा पद्धतीच्या धमक्या देण्यात आल्या सदर घटनेची श्रीरामपूर शहर पोलीस स्थानकात पठाण यांनी रितसर तक्रार दिली आहे सदरील घटनेचा निषेध म्हणून भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार प्राध्यापक मास्टर अनिल कांबळे यांनी नगर जिल्हा पोलीस अधीक्षक व श्रीरामपूर पोलीस स्थानकाचे पो.नि.सानप यांना आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा भीम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या