💥श्रीकांत हिवाळे गुरुजी यांनी उर्वरित आयुष्य समाज सेवेसाठी खर्च करावे...!


💥ज्येष्ठ प्राध्यापक कुंदन खरात यांचे प्रतिपादन💥

पूर्णा ; राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी येथील ज्येष्ठ शिक्षक व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णाचे अध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ व जन्मदिन बुद्ध विहार समिती च्या वतीने भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो व भदंत पया वंश यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड, दैनिक लोकपत्र चे संपादक डॉक्टर गणेश जोशी गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालया ची सचिव प्राध्यापक गोविंद कदम धनगर टाकळी चे सरपंच शिवाजीराव साखरे , राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल चे ज्येष्ठ संचालक भगवान पाटील, दिनाजी गव्हाणे, माजी मुख्याध्यापक वामन पाटील भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ झो डपे, रेल्वे कामगार युनियन चे कॉम्रेड अशोक कांबळे, विजय जोंधळे, अमृत मोरे, वा.रा काळेभारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष मुगाजी खंदारे, श्यामराव जोगदंड, ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे बाबाराव वाघमारे, शहराध्यक्ष बौद्धाचार्य त्रंबक कांबळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.

पूर्णा शहरातील व ग्रामीण भागातील सामाजिक धार्मिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेली महिला मंडळ, यांची प्रमुख उपस्थिती होती. सेवानिवृत्ती व जन्मदिनाचे औचित्य साधून दैनिक रिपब्लिकन गार्ड या वर्तमानपत्राने काढलेल्या गौरव विशेषांकाचे दैनिक लोकपत्र चे संपादक प्राचार्य डॉक्टर गणेश जोशी यांनी विमोचन केले यावेळी मुंबई येथील करियर अकॅडमी कॉलेज अंधेरी येथील ज्येष्ठ प्राध्यापक कुंदन खरात यांनी श्रीकांत हिवाळे यांनी त्यांच्या 33 वर्षांच्या कार्यकाळा मध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला सर्व जाती धर्मातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करून सन्मार्गावर त्यांना आरूढ केले इंग्रजी विषयाच्या जादा तासिका घेतल्या. समर्पित भावनेने विद्यादानाचे कार्य केले. पूर्णा शहरामध्ये सामाजिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. आंबेडकरी व धम्म चळवळीचा वारसा त्यांचे आजोबा बुलढाणा जिल्ह्यातील आंबेडकरी व धम्म चळवळीतील जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते नागोराव जाधव यांच्याकडून घेतलेला आहे.

श्रीकांत हिवाळे गुरुजींनी यापुढील त्यांच आयुष्य आंबेडकरी व धम्म चळवळ गतीमान करण्यासाठी घालवाव निश्चितपणे ते यामध्ये कमी पडणार नाही त्यांना धम्म चळवळ मध्ये रस आहे. त्याग सेवा समर्पणाची भावना त्यांचे मध्ये आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखेचे पदाधिकारी किशोर ढाकरगे अतुल गवळी, अमृत कराळे, उमेश बराटे, सुरज जोंधळे, आदींनी केले याप्रसंगी श्रीकांत हिवाळे व त्यांच्या पत्नी प्रतिभा हिवाळे यांचा मान्यवरांनी व उपस्थितांनी भावपूर्णसत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनीयर पीजी रणवीर यांनी केले उपस्थितांचे आभार प्रफुल्ल श्रीकांत हिवाळे यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या