💥मंगरूळपीर पोलिस प्रशासनाची धाडसी कारवाईश ; शहरासह ग्रामीण भागामध्ये पशुधन चोरी करणारी टोळी गजाआड...!


💥गुन्ह्यामध्ये वापरलेल्या झायलो गाडीसह ३ लाख ५० हजार रूपयांची मुददेमाल जप्त💥

फुलचंद भगत

वाशिम:-पोलीस स्टेशन मंगरूळपीर शहरात वा ग्रामीण भागात मागील काही दिवसामध्ये पशुधन गोवंश गायी चोरी सारख्या अनेक घटना घडल्या असून पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथील दाखल अपराध कमाक ९७०/२०२१ कलम ३७९ भादवि मध्ये अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक जगदाळे यानी ताबडतोब पोलीस स्टेशन डीबी पथक पोउपनि.संतोष आपाव, नापोकाँ / अमोल मुदे, पोका मोहम्मद परसुवाले, सचिन शिंदे, मिलीद भगत,जितेंद्र ठाकरे यांनी सिसिष्टीव्ही फुटेजचे व गुप्त माहीतीच्या आधारे सदर गोवंश चोरून नेणा-या वाहनाचा शोध लावुन वाहन मालक मोहमद जावेद अब्दुल सईद यास गुन्हयात अटक करून त्यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, सदर चोरी करणेकरीता झायलो गाडी वापरली असुन चोरी करणेकरीता माझे साथीदार शेख महेबुब शेख ईस्माईल, शेख जुबेर शेख हबीब, शेख रहेमान शेख अब्दुल्ला सर्व ग अकोला येथील आहेत असे सांगीतले.

असता त्याप्रमाणे लगेच पोउपनि संतोष आधाव व डिवी पथक यानी तपासाची चक्रे फिरवुन गुप्त माहीतीचे आधारे गुन्हयातील उर्वरीत आरोगी शेगाव व अकोला येथुन शिताफिने ताब्यात घेवुन गुन्हयात अटक केली आहे. सदर गुन्हयात आरोपीकडुन

गुन्हयामध्ये वापरलेली चार चाकी वाहन झायलो कमाक एम एच ०४ ई एस ८११७ किमत ३,५०,०००/रूपये असा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास चालू असुन ईतर ठिकाणी आरोपीतानी केलेल्या गुन्हया बाबत जिल्हयातील पोलीस स्टेशन येथे माहीती देण्यात आली आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक साहेब वाशिम, मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब वाशिम, मा उपविभागीय पोलीस अधिकारी

मगरूळपीर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मगरूळपीर तसेच पोलीस निरीक्षक सायबर सेल वाशिम याचे मार्गदर्शनाखाली पोउपनि संतोष आघाव, नापोका /अमोल मुंदे, पोका/मोहम्मद परसुवाले, सचिन शिंदे, मिलींद भगत, जितेंद्र ठाकरे यांनी केली


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या