💥पुर्णा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतांतील उभ्या पिकांचे मोठे नुकसान...!


💥अतिवृष्ठी मुळे गोदावरी पुलावर पाणी आल्याने ताडकळस- पालम राज्य रस्ता वाहतूक बंद💥

💥पुलावरून प्रवास करू नये  सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांनी केले अवाहान💥


पूर्णा (दि.०७ सप्टेंबर) - तालुक्यातील धानोरा काळे येथे मागील चार दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे त्यातच काल बैल पोळा सण शेतकऱ्यांनी आनंदात साजरा केला आणि संध्याकाळी जोरदार पावसाने सुरुवात केली ती चालूच आहे.यामुळे शेत पिकांचे जोरदार होत असलेल्या वादळी  पावसाने प्रचंड नुकसान झाले.खरिपातील सोयाबीन,कापूस ,हळद,ऊस पीक आडवे झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तात्काळ नुकसानीची पाहणी करून आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.


हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळपासून परिसरातील माहेर, मुबर, गोळगाव,धानोरा काळे, बानेगाव, ताडकळस शिवारात  जोरदार पावसाने शिवारातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून हळद पीक जोमदार दिसत होते परंतु पावसाचा जोर वाढतच असल्याने ऊस पीक ही आडवे झाले असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.या जोरदार वादळी पावसाने परिसरातील नदी.नाले,ओढे ओसंडून वाहत असल्याने गोदावरी नदीत येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने नदी तुडुंब वाहत आहे.गोदावरी नदीवर असलेल्या दिग्रस बंधाऱ्याचे दरवाजे उघडून ही पाणी पात्रात बसत नसल्याने वाहतुकीसाठी असलेला पुल पुराच्या पाण्याखाली गेला असल्याने ताडकळस ,पालम राज्य रस्त्यावरील वाहतूक बंद पडली यामुळे प्रवाश्यांना मोठी अडचण झाली .जोरदार पावसाने शिवारातील खरीप पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने पंचनामे करून तात्काळ नुकसान  भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या