💥शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही -- रोहयो फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे


💥गणेशनगर येथील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते💥

संभाजीनगर / औरंगाबाद  25

राज्यात जनतेचे काम करणारे सरकार असून "ठाकरे सरकार" म्हणजे जे बोलणार ते करून दाखवणारच. संभाजीनगर जिल्ह्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विशेष प्रेम होते आणि कर्म,धर्म,संयोगाने जनतेच्या आशीर्वादामुळे मी मंत्री आहे यामुळे शहराच्या विकासासाठी तत्पर राहून निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले महानगरपालिका क्षेत्रातील श्री सरकारी गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, गणेशनगर येथील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 40, गणेशनगर "श्री" सहकारी गृहनिर्माण हौसिंग सोसायटी येथे करण्यात येणार्‍या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन आज (दि.25) रोजी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अंबादास दानवे, विधानसभा संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,उपशहरप्रमुख मकरंद कुलकर्णी, सुरेश कर्डिले,अनिल जैस्वाल ,संजय हरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले की निवडणुका आहेत म्हणून विकास कामे करायची असे नसून शिवसेना कायम समाजसेवा, जनतेच्या सेवेला प्राधान्य देत आली आहे राज्यात आज शिवसेना सत्तेत आहे ठाकरे सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामे करून या शहराला सुपर संभाजीनगर करू यापुढेही शहराच्या विकासासाठी आमची भूमिका अग्रेसर राहील. आणि शहराचा विकास करत असतानाच हिंदुत्वाचा विचार सुद्धा पुढे घेऊन जाऊ असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते  आमदार दानवे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक वीरभद्र गादगे ,उपविभागप्रमुख कमलेश तीळवे, रमेश तुपे ,संजय मस्के, राहुल सोनवणे ,शाखाप्रमुख चंद्रकांत देवराज ,प्रतीक अंकुश, बद्रीनाथ ठोंबरे ,ज्ञानेश्वर शेळके, उपशाखाप्रमुख रवींद्र पाठक, पृथ्वीराज राठोड, बाळासाहेब दानवे, सतीश थोरात, अशोक पवार, आनंद कुलकर्णी, श्री हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे ,उपाध्यक्ष गोरडे पाटील ,सचिव सुबोध काळे, सदस्य मधुकरराव पाथ्रीकर, महिला आघाडी विभागसंघटक रेखा मोदी, उपविभाग संघटक छाया देवराज, शाखा संघटक शुभांगी कुलकर्णी, सानिका देवराज आदी शिवसैनिक, पदाधिकारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या