💥पिंपरी चिंचवड मधील दुर्दैवी घटना ; गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन जण इंद्रायणी नदीमध्ये बुडाले...!


💥एकाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला आले यश💥 

पिंपरी-चिंचवडमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले दोन तरुण इंद्रायणी नदीमध्ये बुडाल्याची घटना घडली असून एकाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे ही घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली असून सध्या एकाचा शोध सुरू असून अंधार असल्याने शोधकार्य थांबविण्यात आले आहे. 

अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांनी दिली आहे दत्ता ठोंबरे (वय- २०) आणि प्रज्वल काळे (वय- १८) अशी नदीमध्ये बुडालेल्या तरुणांची नाव आहेत यापैकी, प्रज्वल काळे याचा मृतदेह आढळला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता ठोंबरे आणि प्रज्वल काळे कुटुंबासह आळंदी रोडवरील इंद्रायणी नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी गेले होते. कुटुंबातील काही सदस्य हे नदीच्या काठावर थांबले होते दरम्यान, दत्ता आणि प्रज्वल यांच्यासह नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी नितीन ठोंबरे, शिवाजी ठोंबरे हे पाण्यात उतरले होते.

दत्ता आणि प्रज्वल यांनी गणपती बाप्पांचे इंद्रायणी नदी पात्रात जाऊन विसर्जन केले तेव्हा, विसर्जन झाल्यानंतर दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले, दोघांना पोहायला येत नव्हते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे त्या दोघांना वाचवण्यासाठी नितीन आणि शिवाजी यांनी प्रयत्न केले परंतु ते दिसेनासे झाल्यानंतर नदीच्या बाहेर आले. घटनेची माहिती भोसरी औद्योगिक वसाहत परिसर पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. पैकी, प्रज्वल चा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

तर, दत्ता ठोंबरे याचा शोध सुरू असून अंधार झाल्याने रात्री उशिरा शोधकार्य थांबवले आहे अशी माहिती भोसरी एम.आय.डी.सी. पोलिसांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या