💥कंडोम वापरला म्हणजे संमतीने सेक्स झाला असं नाही ; बलात्कार प्रकरणासंदर्भात मे.न्यायालयाची टीप्पणी....!


💥एका नौदलातील कर्मचाऱ्यावर सहयोगी मित्राच्या पत्निवर बलात्कार केल्याचा आरोप आहे💥 

मुंबईच्या मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री जे घरत यांनी एका नौदलाच्या अधिकाऱ्याला बलात्काराच्या खटल्याचा तपास संपल्याच्या कारणावरून जामीन मंजूर केला परंतु यावेळी मे.न्यायालयाने बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना “कंडोम वापरले याचा अर्थ असा नाही की संमतीने सेक्स केला” अशी टीप्पणी केली आहे. 

एका नौदलातील कर्मचाऱ्यावर सहयोगी मित्राच्या पत्निवर बलात्कार केल्याचा आरोप आहे त्याच्या जामीनाच्या याचीकेवर मे.न्यायालयात सुनावणी सुरु होती सुनावणीदरम्यान मे.न्यायालयाने सांगितले की, केवळ घटनास्थळी कंडोम उपस्थित असल्यामुळे तक्रारदाराचे आरोपीशी सहमतीचे संबंध होते, असे म्हणणे पुरेसे नाही असेही होऊ शकते की आरोपीने पुढील त्रास टाळण्यासाठी कंडोमचा वापर केला. एका नौदल कर्मचाऱ्यावर बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणात मे.न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

नौदलातील जवानावर त्याच्या सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे मे.न्यायालयात त्याने दावा केला होता की संबंध दोन्ही बाजूने संमतीनंतरच केले गेले या दाव्याच्या समर्थनार्थ ते कंडोम लावण्याविषयी बोलले होते त्यावर मे.न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे मुलीने कंडोम खरेदी करण्यात चुकीचं काय ?; अभिनेत्रीचा संतप्त सवाल आरोपीने पीडितेला पतीला सांगू नको, असे धमकावले होते मात्र तिने तिच्या पतीला ही घटना सांगितली आणि त्याने लगेच येऊन पोलिसांना कळवले. आरोपपत्र दाखल करण्यात आले.

 त्यानंतर आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता जामिनावरील सुनावणी दरम्यान, आरोपींकडून हजर असलेले वकील नीलेश दलाल यांनी युक्तिवाद केला की त्याला फसवले जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या