💥महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सखाराम महाराजांना सपत्नीक अभिषेक...!


💥सौ सपना मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक सखाराम महाराजांचे दर्शन💥 

फुलचंद भगत -

वाशिम :- रिसोड तालुक्यातील श्रीक्षेत्र लोणी बु येथे आज दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री मा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी त्यांच्या पत्नी सखाराम महाराजांच्या निस्सीम भक्त असल्याने सौ सपना सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सखाराम महाराज संस्थान मध्ये सखाराम महाराजांचे दर्शन घेऊन सुधीरभाऊ नि त्यांच्या पत्नीसह मुलगी व जावई या सर्वांनी संत सखाराम महाराजांना 11 ब्राम्हणांद्वारे अभिषेक अर्पण केला यावेळी आज सकाळी पासूनच सखाराम महाराज मंदिरामध्ये झेंडू,गुलाब,शेवंती आदी फुलांचा वापर  करून फुलांची आरास करण्यात आली होती तसेच संपूर्ण मंदिरास लखलखीत लाईटिंग टाकण्यात आली होती तसेच सुधीरभाऊ अर्थमंत्री असतांना त्यांनी लोणी बु गावाला जवळपास 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला त्यामध्ये जवळपास 11 कोटी रुपयांचा निधी खर्च देखील झाला मात्र प्रशासनाच्या आणि ठेकेदारांच्या नाकर्तेपणा मुले मात्र निधीची 100 टक्के अमलबजावणी न होता गावामध्ये विकासकामे झालीपन त्यामध्ये गुणवत्ता मात्र पहावयास मिळत नाही अनेक ठिकाणी काँक्रीट रस्त्यावर चिखल साचून राहतो तर स्ट्रीट लाईट मात्र शोभेची वस्तू बनल्या आहेत लोणी बु संस्थान मध्ये मंदिरे बंद असतानाही मात्र अभिषेक साजरा करण्यात आला.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या