💥जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा नांदगावचा अतिवृष्टी दौरा वादळी ठरला💥

 ✍️ मोहन चौकेकर

▪️साकीनाका अत्याचार पीडित महिलेची मृत्युशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू. संतापाची लाट उसळली! संतप्त प्रतिक्रिया, पीडितेच्या मृत्यूनंतर विरोधी पक्ष आक्रमक, आरोपीला फाशी देण्याची मागणी.

▪️साकीनाका घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश. सहायक पोलिस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्याकडे सोपवला तपास.. एका महिन्यात तपास पूर्ण करण्याच्या पोलिस आयुक्तांच्या सूचना.

▪️गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा... वर्षभरातच निवडणुका असलेल्या गुजरातमध्ये नेतृत्वबदल झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य..

▪️महिलेसोबत अश्लील संभाषण करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला चोप, कल्याणमधील प्रकार.. तर अमरावतीत बलात्कारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने आत्महत्या..

▪️फसवणूक आणि बलात्कारासारखे गुन्हे दाखल झालेला मनोहरमामा बारामती पोलिसांच्या कोठडीत.. राजकारणी आणि बड्या मंडळींनाही मनोहरमामाची भुरळ..

▪️हिमाचल पाठोपाठ गोव्यातही 100 टक्के लसीकरण, देशात 73 कोटी डोस वितरित, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गोवा सरकारचं कौतुक.

▪️देशात गेल्या 24 तासात 33 हजार रुग्णांची भर, 25 हजार रुग्ण एकट्या केरळमधून. राज्यात शुक्रवारी 4,154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात.

▪️अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरून दोन गटात राडा, 2 विनयभंगासह 20 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल..

▪️नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा नांदगावचा अतिवृष्टी दौरा वादळी ठरला. तहसील कार्यालयातील बैठकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे व भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या