💥भारतीय ड्रॉप रोबॉल महासंघाच्या कोषाध्यक्षपदी दत्ता गिरी गोसावी (महाराष्ट्र) यांची निवड...!


💥त्यांच्या या निवडी बद्दल परभणी जिल्ह्यातील सर्व ड्रॉप रोबॉल क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे💥

पूर्णा (दि १४ सप्टेंबर) ; भारतीय ड्रॉप रोबॉल महासंघाची चौथी सर्वसाधारण सभा दिनांक 12 रोजी रोहतक हरियाणा येथे पार पडली यावेळी भारतीय ड्रॉप रोबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी डॉ.देवेंद्रसिंग धुल हरियाणा सचिवपदी डॉ.अजय रंगा चंदिगड तर कोषाध्यक्षपदी दत्तागिरी गोसावी महाराष्ट्र आदींच्या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या त्यांच्या निवडीचे स्वागत सदाशिव बोबडे उपाध्यक्ष ड्रॉप रोबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र शिवाजीराव बोबडे प्रसिद्धीप्रमुख रामचंद्र डुकरे सुभाष पवार सौरभ दैठणकर आदीसह परभणी जिल्ह्यातील सर्व ड्रॉप रोबॉल क्रीडाप्रेमींनी केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या