💥पुर्णेतील अस्वच्छ पाणीपुरवठा देतोय धोक्याची घंटा : नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांच्या जिविताशी खेळ...!


💥अस्वच्छ पाणीपुरवठ्यास शहरात सर्वत्र पसरलेली अस्वच्छता ठरत आहे नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक💥


पुर्णा (दि.१९ सप्टेंबर) - पुर्णा नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे नगर परिषदेचा कारभार अनियंत्रित झाल्याचे निदर्शनास येत असून नगर परिषद आरोग्य व स्वच्छता विभाग,बांधकाम विभाग,वसुली विभागासह पाणीपुरवठा विभागाचा कारभारही संपूर्णतः ढेपाळल्याचे निदर्शनास येत असून नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी निलेश सुंकेवार हे नगर परिषदेचा कारभार हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे शहरात अंधेर नगरी चौपट राज...झाल्याचे दिसत असून आरोग्य व स्वच्छता विभागात कोरोना महामारी काळात स्वतःच्या जिवावर उध्दार होऊन कर्तव्य सेवा बजावणाऱ्या अनेक महिला व पुरूष स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांना नगर परिषद प्रशासनाने 'काम सरो वैद्य मरो' पध्दतीचा अवलंब करून घरी बसवल्यामुळे शहरात स्वच्छतेसह जनसामान्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शहरातील मुख्य बाजारपेठेसह सार्वजनिक रस्त्यांवर अक्षरशः कचऱ्याची ढिगार साचय्याचे निदर्शनास येत आहे.


शहरातील मुख्य बाजारपेठ सार्वजनिक रस्ते तसेच विविध भागातील नाल्या-गटार अक्षरशः तुंबली असून या तुंबलेल्या नाल्यांतील अस्वच्छ पाणी घाण रस्त्यांवर आल्याने डासांच्या झुंडीच्या झुंडी नागकांवर तुटून पडत असून शहरात मलेरीया,कावीळ,डेंग्यू चिकनगुनीया सारख्या साथीच्या आजारांसह नागरिकांना चर्मरोगांनीही ग्रासल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषद प्रशासनावर मुख्याधिकारी सुंकेवार यांचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसून मुख्याधिकारी सुंकेवार यांचा आव..रे लड्डू जाव..रे लड्डू अश्या पध्दतीचा झाल्यामुळे नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचा अनियंत्रित झालेला कारभार धोक्याची घंटी वाजवतांना दिसत असून नागरिकांना नगर परिषद प्रशासनाकडून होणारा पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा अस्वच्छ व जंतुयुक्त तसेच 'विदाऊट फिल्टर' केला जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे असून पाणुपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी पाण्यात ब्लिचिंग पावडर तसेच तुरटीचा वापर योग्य पध्दतीने करीत नसल्यामुळे पाणीपुरवठा पाईप लाईन द्वारे नागरिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून जिवंत तसेच मृत माश्या जंतूही येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून शहरातील अनेक भागातील नाल्यांतून गेलेली पाणीपुरवठा पाईप लाईन फुटल्यामुळे परिसरातील नागरिकांना नालीचे जंतु आळ्यायुक्त पाणी सुध्दा भरावे लागत आहे अश्या या अस्वच्छ पाणीपुरवठ्यामुळेच नागरिकांना विविध साथीच्या आजारांनी ग्रासल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या निश्क्रिय व गलथान कारभाराकडे जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी तात्काळ लक्ष देवून नगर परिषद प्रशासनाच्या अनियंत्रित कारभाराला तात्काळ लगाम लावावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या