💥वाशिम येथील जान्हवीने राज्यस्तरीय महाराष्ट्र एअर गन स्पर्धेत मिळविले 4 सुवर्ण पदक...!


💥शूटर जान्हवीचे जिल्ह्याभरात सर्वत्र होत आहे कौतुक💥 

फुलचंद भगत

वाशिम:- नुकतीच नागपूर येथे पार पडलेल्या ( MAGC ) एअर पिस्टल शुटिंग स्पर्धेत वाशिम जिल्हा रायफल शुटिंग अशोशिएशन वाशिमची कु.जानवी विद्याधर मानतकर  या विद्यार्थिनीने आपल्या वयोगटात मुलीपैकी  चारही शुटींग स्पर्ध्येत प्रावीन्य मिळवून 4 सुवर्ण पदक प्राप्त केले,तर सोनल पुरुषोत्तम चव्हाण या शूटर ने युथ व ज्युनियर स्पर्ध्येत द्वितीय पदक तर यापूर्वी सुद्धा सोनल चव्हाण हिने सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करीत सिनियर आणि युथ गटात सुवर्ण तर ज्युनियर गटात कांस्य पदक पटकाविले होते. मृणाली महेश आकरे हिला सब युथ मध्ये द्वितीय पदक प्राप्त झाले आहे.जानवी मानतकर हिने  संपूर्ण महाराष्ट्रातून मुलींपैकी सब-युथ वयोगटात सुवर्ण पदक, युथ वयोगटात सुवर्ण पदक, ज्युनियर वयोगटात सुवर्ण पदक तसेच सिनियर वयोगटात सुवर्ण पदक घेऊन इतिहास रचला आहे,या स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय अशोशिएशन चे अध्यक्ष दिलीप हेडा,प्रशिक्षक प्रल्हाद आळणे,व आपले आई/वडील यांना दिले असून  या शूटरचे जिल्ह्याभरात सर्वत्र कौतुक होत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या