💥दिव्य ज्योति जागृती संस्थानच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव 2021 उत्साहात साजरा....!


💥तरुणांच्या सक्षमीकरणाद्वारे वैश्विक बंधुत्व आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी हे संघटन कार्यरत आहे💥


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

कोविड जागतिक महामारीच्या या संघर्षमय स्थितीमध्ये , जिथे संपूर्ण समाज आर्थिक संकट, आरोग्य समस्या, मानसिक तानतणाव किंवा कौटुंबिक समस्यांना तोंड देत आहेत, अश्या परिस्थितीत मानवतेला समाधान आणि सहनशक्ती प्रदान करण्याचा अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे. केवळ अध्यात्माद्वारेच प्रत्येक व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकते आणि हेच अटळ सत्य आहे. ज्याला  वेळोवेळी आपल्या संत महापुरुषांनी मनुष्याला स्मरण करून दिले आहे. दिव्य ज्योती जाग्रती संस्थान [DJJS] चे संस्थापक आणि संचालक दिव्य गुरू श्री आशुतोष महाराज जी, आजही मनुष्याला अध्यात्माच्या महत्वाची केवळ जाणीवच करून देत नाहीत, तर मनुष्याला त्याचे सार 'ब्रह्मज्ञान', आत्मसाक्षात्काराची सनातन विज्ञानाद्वारे प्रयोगात्मक पद्धतीने अनुभूती ही करून देत आहेत.


संपूर्ण विश्वातील असंख्य लोकांच्या आध्यात्मिक समाधानासाठी, DJJS ने श्री कृष्ण जन्माष्टमी २०२१ च्या शुभ मुहूर्तावर 'संभवामि युगे युगे' या विषयावर आधारित एक विशेष सामाजिक-सांस्कृतिक-आध्यात्मिक व्हर्चुअल कार्यक्रमाचे आयोजित केले. वरील शीर्षक श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्णाने सांगितल्याप्रमाणे ‘मी सज्जनांच्या रक्षणासाठी आणि अधर्माचा विनाश करण्यासाठी पुन्हा पुन्हा धरतीवर अवतरीत होईल' या सर्वाभौमिक उदघोषावर आधारित होते. या भव्य ऑनलाइन कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक २९ आणि ३० ऑगस्ट रोजी अनुक्रमे भाग १ आणि भाग २ मध्ये DJJS यूट्यूब चॅनेल [youtube.com/djjsworld] च्या माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात आले. तसेच संपूर्ण कार्यक्रम जन्माष्टमीच्या रात्री दिनांक ३० ऑगस्ट, २०२१ रोजी रात्री ८ ते मध्यरात्री १२ पर्यंत पुन्हा प्रसारित करण्यात आला. यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य लोकांनी घरी बसून या दिव्य कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे. तसेच या दोन दिवसांमध्ये सोशल मीडिया / ट्विटर अॅप वर #DJJSJamashtami आणि #SambhavamiYugeYuge हॅशटॅग दिवसातून अनेक वेळा ट्रेंड करत होते. संस्थेचे मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि नृत्य नाटकांचे देखील इन्स्टाग्राम रीलमध्ये खूप कौतुक झाले. 

या कार्यक्रमात, श्री कृष्णाविषयी समाजात पसरलेल्या भ्रांतीना ना केवळ दूर केले तर जन्माष्टमीचा सण केवळ दही-हंडी, उपवास किंवा सजावटीपुरता मर्यादित नसून तो भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य प्रेरणांना आत्मसात करून त्यांनी दाखवलेल्या आध्यात्मिक मार्गावर संकल्प धारण करण्याचा उत्सव आहे हे स्पष्ट केले. श्री कृष्णाने अवतार घेणे एक उत्सव का आहे ? श्री कृष्णाची शाश्वत चेतना आजही आपले जीवन कसे दिव्य बनवू शकते? आज आपन केवळ भगवान श्री कृष्णावर विश्वास ठेवता की त्यांच्या आज्ञेचे ही पालन करतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे विविध माध्यमांद्वारे देण्यात आली. या कार्यक्रमात श्रीमद्भागवतगीतेमध्ये समाविष्ठ असलेल्या आध्यात्मिक रत्नांना सादर करून जगतगुरु भगवान श्री कृष्णाच्या चरणी भक्तीभावाने नमन अर्पित करण्यात आले. भगवान श्री कृष्णाच्या जीवन गाथेला ज्ञानवर्धक नृत्य-नाटकांद्वारे प्रस्तुत करून विद्वान प्रचारकांद्वारे श्री कृष्णाच्या लीलांचे विश्लेषण केले गेले.

भगवान श्री कृष्णाद्वारे अर्जुनाला दिलेले 'गीता-ज्ञान'; भगवान विष्णूचे दोन द्वारपाल 'जय-विजय' ची गाथा, ज्यांनी अहंकार वश धर्माचा मार्ग सोडून दिल्याबद्दल शापित झाले होते,  मीराबाईजिंच्या भक्तीचे चित्रण करणाऱ्या 'प्यारे दर्शन दिजो' सारख्या रोमांचक नाट्य कार्यशाळा, 'केशव माधव' आणि 'गुरु वंदना' वर नृत्य नाटके आणि श्री कृष्णाची मंगल आरती हे या भव्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. या सर्व सादरीकरणाचा सर्वात विशेष पैलू म्हणजे त्यांच्यामध्ये अंतर्भूत सेवाभाव. हे उल्लेखनीय आहे की, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांपैकी कोणीही नाव, कीर्ती आणि पैशासाठी काम करणारे वेतन-व्यावसायिक नसून ते सर्व युवा कलाकार दिव्य गुरु श्री आशुतोष महाराज जींचे निस्वार्थी, समर्पित, जागृत भ्रमज्ञानी शिष्य होते. ज्यांनी समाजकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन या कार्यक्रमासाठी स्वतःला वाहून घेतले. प्रत्येक प्रस्तुती दैवी उत्साह आणि ऊर्जाने भरलेली होती कारण सर्व कलाकार प्रदर्शन करण्यापूर्वी ब्रह्मज्ञान आधारित ध्यान साधना करत असत. या रंगमंचावर उच्चकोटीचे अनुशासन दिसून आले. या नाट्यनिर्मितीमध्ये दिसणारे जोडपे वास्तविक जीवनात देखील विवाहित आहेत.

जगभरातील असंख्य प्रेक्षकांनी घरी बसून पाहिलेल्या या कार्यक्रमाला व्यापक मीडिया कव्हरेज आणि सर्वांचे कौतुक मिळाले. जरी संस्था तीन दशकांहून अधिक काळापासून जन्माष्टमीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करत असली तरी, हा कार्यक्रम सर्वात खास आणि अद्वितीय होता. कारण DJJS संस्थांच्या ३५० हून अधिक विश्वव्यापी शाखांमधून दिव्य गुरू श्री आशुतोष महाराज जींचे सर्व वयोगटातील हजारो शिष्य, आपल्या घरातून बाहेर येवून कोविड प्रोटोकॉलचे पालन करत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, मंदिरे, मॉल, उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी पोचले व कार्यक्रमाचा प्रचार प्रसार केला. आणि हा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. या दिव्य कार्यक्रमाने 'वसुधैव कुटुंबकं'ची भावना केवळ मात्र जागृतच नाही केली तर वास्तविकते मध्ये साकार करून दाखवली. देशभरातील सुमारे ७५ केंद्रांवर प्रसिद्ध कॉफी शॉप चेन कॅफे कॉफी डे [CCD] च्या डिजिटल जाहिरातींद्वारे या कार्यक्रमाची जाहिरात करण्यात आली. तसेच जगभरातील स्थानिक माध्यमांनीही त्यांच्या संबंधित वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांद्वारे कार्यक्रमा संबंधित प्रचार केला. त्याचबरोबर, अहमदाबादचे सुप्रसिद्ध कर्णावती क्लब आणि राजपथ क्लब तसेच बिहार, उत्तर प्रदेश आणि ओरिसाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात या कार्यक्रमाचे सामुदायिक डिजिटल स्क्रीनिंग देखील करण्यात आले.

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने बॉलीवूड अभिनेता ,सेलिब्रिटी आणि प्रभावशाली दिग्गज व्यक्तिमत्त्व अशा - श्री सिंग अखिलेंद्र मिश्रा त्यांच्या क्रूर सिंगच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे ;  राष्ट्रीय गायन रियालिटी शो 'व्हॉईस ऑफ इंडिया किड्स' विजेता - सुश्री निष्ठा शर्मा;  प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि राजकारणी - श्री रवि किशन; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक - स्मृती गुरु सुधांशु सिंघल; सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार- श्री संदीप देव; प्रख्यात विनोदी कलाकार श्री दीपक राजा आणि श्री मणी लाहिरी; आंतरराष्ट्रीय ख्यातीचे UPSC परीक्षा प्रशिक्षक श्री अवध ओझा; श्याम सुंदर पाठक; कल्चर क्रिएटर, पीक परफॉर्मेंस कोच, स्टोरी टेल्लर व लेखक सुश्री रिंकू साहनी; अभिनेता, मॉडेल, अभियंता श्री वरुण जोशी; ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील ऑस्ट्रेलियन इंडियन रेडिओचे सीईओ. श्री उमेशचंद्र ओम; यूके चे अल्पाइन समूहाचे संचालक डॉ. गुरप्रीत कहलोन कोहली; भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री सुश्री स्मृती कश्यप; WWE. चॅम्पियन द ग्रेट खली; जागतिक मानवाधिकार संघटना प्रमुख, संचालक, श्री विवेक अग्रवाल; खासेओल कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी. श्री अजय सहगल; व्यवसाय प्रशिक्षक आणि सनसिटी सोलर प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी श्री राकेश भाटी; आसारा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष श्री. आर. गोयल; इनव्हर्टिस विद्यापीठ उत्तर प्रदेशचे कुलपती डॉ. उमेश गौतम; प्रख्यात भजन गायक श्री नंदू मिश्रा; प्रसिद्ध पंजाबी गायक श्री विपुल मेहता, श्री तेजी संधू आणि श्री फिरोज खान; पंजाबी गायक आणि लेखक सत्ती खोखेवालिया; संगीत कलाकार आणि गायक श्री मदन मड्डी; हिमाचल प्रदेशातील नाहन परिसरातील कारागृह अधीक्षक श्री सुशील कुमार ठाकूर; सरकारी आश्वासन समिती अध्यक्ष, लोकसभा सदस्य, श्री राजेंद्र अग्रवाल; राज्यसभा सदस्य श्री देवेंद्र हितकरी; छत्तीसगडचे खासदार श्री संतोष पांडे;  बांसवाडा दरबार, राजस्थान चे महाराजा माननीय जगमल सिंह; पंजाबचे आरोग्य मंत्री श्री बलबीर सिंह सिद्धू; चंदीगडचे महापौर श्री रविकांत शर्मा; पंचकुलाचे महापौर श्री कुलभूषण गोयल; पुणे महानगरपालिका [PMC] महापौर श्री मुरलीधर मोहोळ; महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे चे अध्यक्ष श्री वसंत मोरे आणि इतर अनेकांनी D.J.J.S. जन्माष्टमीचा प्रचार प्रसार त्याच्या सोशल मीडिया हँडल तसेच व्हिडिओ संदेशांद्वारे केला आणि कार्यक्रमाला एक सफलतापूर्वक यश मिळवून दिले.

DJJS ही एक अलाभकारी सामाजिक-आध्यात्मिक संघटन आहे, ज्या द्वारे जागतिक स्तरावर पुढील प्रमाणे सामाजिक सुधारणा आणि कल्याणकारी कार्यक्रम राबविले जातात - लिंग समानता, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, मादक पदार्थांचे गैरवापर निर्मूलन, पर्यावरण संरक्षण, भारतीय गाय जाती सुधारणा आणि संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, अपंग आणि कैद्यांचे सशक्तीकरण. तसेच कॉर्पोरेट क्षेत्र आणि तरुणांच्या सक्षमीकरणाद्वारे वैश्विक बंधुत्व आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी हे संघटन कार्यरत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या