💥शिवसेनेने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 15 जणांवर मोफत शस्त्रक्रिया करून केली वचनपूर्ती....!


💥शिवसेना शाखा प्रियदर्शनी- इंदिरानगर व लायन्स क्लब मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबीराचे आयोजन💥

✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर / औरंगाबाद : शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा प्रियदर्शनी- इंदिरानगर व लायन्स क्लब मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दि. 22 सप्टेंबर रोजी गरीब व गरजू आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या अशा 15 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.


दिनांक 08 सप्टेंबर रोजी शिवसेना शाखा प्रियदर्शनी नगर इंदिरानगर यांच्यावतीने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले होते यावेळी तब्बल 350 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली होती यापैकी बऱ्याच रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले त्यामुळे त्यांची दृष्टी कमी झाली असल्याकारणाने डॉक्टरांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले होते. शिवसेना उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे व उपशाखाप्रमुख सुखराज हिवराळे यांनी पुढाकार घेऊन  शिवसेना व लायन्स मीडटाऊन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 15 रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

  याप्रसंगी शहरप्रमुख विजय वाघचौरे युवासेना शहर चिटणीस धर्मराज अंबादास दानवे उपशहरप्रमुख संजय बारवाल  शाखाप्रमुख देविदास पवार मोहन तिरचे उपशाखाप्रमुख मनोज चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती या शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ बायस  मॅडम, डॉ अग्रवाल सर, डॉ अनिल साळुंके,  डॉ पवार सर, शुभम दाभाडे, समता फाऊंडेशन, शिवानंद महालिंगे,नितीन सोनावणे, अण्णा दाभाडे, गुलाब भाई  बाबा सेट , बशीर भाई यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रियदर्शनी नगर इंदिरानगर परिसरातील

 सुधाकर पगारे ,रामदास वाघ, रतन चाबुकस्वार, लीलाबाई चव्हाण,सुखदेव सदावर्ते, रविंद्र खांबगावकर,अंतीकाबाई इंगळे, प्रमोद कापसे, लीलाबाई जुमडे, गुलाब बर्थडे, शौकत भाई, लाला खा पठाण, साहेबराव जाधव या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली गेलेली दृष्टी परत आल्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानून या उपक्रमाचे कौतुक केले.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या