💥हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा : राज्यात आजही तब्बल 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी...!


💥दरम्यान,हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम 💥

 ✍️ मोहन चौकेकर

संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपले असून या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच जीवितहानीही झाली आहे त्यातच आता हवामान विभागाने राज्यातील 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर एका जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे.

💥या' जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट :-

▪️आज ज्या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, कोल्हापूर, सातारा, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. 

▪️तर पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना आणि अकोला जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या