💥परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे पौळ पिंपरीत शॉर्टसर्किट मुळे 10 एकर ऊसाची राखरांगोळी....!


💥पंचनामा करून महावितरणने नुकसानीची भरपाई करावी; नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मागणी💥 

परळी l प्रतिनिधी

परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथील एका शेतकऱ्याचा तब्बल 10 एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. सकाळच्या सुमारास शेतकरी गावात असतांना शेतातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट झाले आणि त्यामुळे आग लागली. 


पौळ पिंपरी येथील शेतकरी बबन नरहरी पौळ आणि युवराज बालासाहेब पौळ या दोन शेकऱ्यांचा 10 एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. 8 ते 10 महिन्यांपूर्वी ऊसाची लागण केलेली होती. विद्यमान परिस्थितीत साखर कारखाने बंद आहेत. कारखाने बंद असल्याने या ऊसाचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान संभावित आहे. आतापर्यंत या शेतकऱ्यांनी तब्बल 5 ते 6 लाखांचा खर्च यावर केलेला असून, दत्तक बँकांचे कर्जही घेतलेले आहे. एवढा खर्च करून मुलाप्रमाणे जोपासलेल्या या पिकातून 15 ते 16 लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. संपूर्ण 10 एकरवरील ऊसाचे पीक जळून खाक झाल्याने या शेकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलीये. महसूल आणि कृषी विभागाने पंचनामा केला असून, महावितरणकडून कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. झालेल्या नुकसानीची पंचनामे करून भरपाई दिली जावी अशी अपेक्षा या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या