💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरात मुख्य रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने बुजवून प्रतिकात्मक आंदोलन.....!


💥रस्त्यांच्या बिकट अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी १५ दिवसाआधी प्रहार जनशक्ती पक्षाकडून बेशर्मीची झाड लावण्यात आली होती 💥

परभणी - परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शहरातील मुख्य रस्त्यांसह वस्त्यामधील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असुन वाहने चालविणे तर दूरच नागरीकांना पायी चालणे देखील आवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मनके व कंबरदुखी च्या आजाराने ग्रासले आहे, शहरातील रस्त्यांच्या बिकट अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मागील १५ दिवसाआधी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक येथील रस्त्यावर पडलेल्या खड्यामध्ये बेशरमाची झाडे लावुन परभणी महानगरपालिकेचा निधेष केला होता. 

या नंतरही कुंभकर्णाच्या झोपत असलेल्या परभणी शहर महानगरपालिका प्रशासनास जाग आली नाही व संबंधीत खडे बुजविण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले नाही. यामुळे परभणी शहर महानगरपालिकेच्या गालथान कारभाराचा निषेध म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील शिवाजी चौक व गांधीपार्क येथील रस्त्यावर पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजवत प्रतिकात्मक स्वरुपात आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी परभणी शहर महानगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ दिलेल्या घोषणांनी परिसर दनानुन सोडला होता. या आंदोलनानंतरही जर पालिका प्रशासनाने त्वरीत शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती न घेतल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सामान्य जनतेला होणारा त्रास महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनाही व्हावा या उद्देशाने महानगरपालिका समोरील रस्त्यांवर खड्डे केले जाणार असल्याची घोषणा यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आली. आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, मिडिया प्रभारी नकुल होगे,सर्कल प्रमुख अंगद सुरवसे, शंकर दामोदर, वैभव संघई, अरुण कांबळे, कैलास राष्ट्रकुट, मंगेश वाकोडे यांच्यासह प्रहार सैनिक उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या