💥पुर्णा तालुक्यातील सुहागण येथे साहित्यिक सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे साठे यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी....!


💥'पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी कामगार यांच्या तळहातावर तरलेली आहे'💥

पुर्णा (दि.०१ अॉगस्ट) - 'पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून  कष्टकरी कामगार यांच्या तळहातावर तरलेली आहे' असा संदेश देऊन कष्टकरी कामगारांना जगात सन्मान मिळवून देणारे थोर साहित्य सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे साठे यांची १०१ वी आज रविवार दि.०१ आॕगस्ट २०२१ रोजी पुर्णा तालुक्यातील सुहागण येथे उत्साहात जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुहागण ग्रामपंचायतचे सरपंच दाजीबा भोसले,शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ (अप्पा) भोसले ग्रामपंचायत सदस्य उद्धवजी भोसले माऊली भोसले ग्रामपंचायत सेवक बापूराव भोसले मातंग समाजातील सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्साहाने साजरी करण्यासाठी नागोराव वाघमारे प्रकाश वाघमारे,मुरली वाघमारे मल्‍हारी वाघमारे विष्णुकांत वाघमारे बालाजी वाघमारे गोपाळ वाघमारे बंडू वाघमारे रवी वाघमारे आत्माराम वाघमारे कृष्ण वाघमारे देवराव वाघमारे सोनाजी पावडे  सामाजिक कार्यकर्ते अरुण वाघमारे समस्त गावकरी मंडळी आदींनी विशेष परिश्रम केले... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या