💥तुम्ही आयुष्यात एवढे मोठे व्हा एखादं समुद्रात बेट विकत घ्या मात्र आई-वडीलाना घरात दहा बाय दहाची खोली द्या - प्रा.भुसारे

💥प्रा.नंदकिशोर बोगळे यांनी 33 वर्षे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल' आयोजित सेवा गौरव' कार्यक्रमात ते बोलात होते💥

पूर्णा ; तुम्ही आयुष्यात एवढे मोठे व्हा एखादं समुद्रात बेट विकत घ्या मात्र आई-वडीलाना घरात 10बाय 10 ची खोली द्या भरपुर सुख द्या  असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी प्रा.विठ्ठलराव भुसारे यांनी केले .


गौर येथील श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर भिमाशंकर बोगळे यांनी 33 वर्षे शिक्षण क्षेत्रात  उत्कृष्ट कार्य केलयाबद्दल' सेवा गौरव' कार्यक्रम विद्यालयातील सर्व  कर्मचारी बांधवानकडुन आयोजन करण्यात आले होते प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी प्रा . विठ्ठलराव भुसारे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव रंगनाथ पारवे ,ज्येष्ठ समाजसेवक डॉ.दत्तात्रय वाघमारे,माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम लेखाधिकारी विक्रम देशमुख,दै.सत्यप्रभाचे संपादक संतोष पांडागळे ,प्राचार्य बापुसाहेब काळबांडे ,साहेबराव कदम,प्राचार्य मोहनराव मोरे,सेवाननिवृत्त ज्येष्ठ मुख्याध्यापक हिराजी भोसले, जगदीश जोगदंड,राजेश धूत , प्राचार्य गोपाळ भुसारे  यांची प्रमुख उपस्थिती होती . 

         पुढे बोलतांना प्राचार्य मोहनराव मोरे यांनी गौर परीसरात गोरगरीबांसाठी दिनदलीतांसाठी माध्यमिक शाळा काढून अनेक मुलामुलीना  शिक्षणाची दारे खुली केली ते काम नंदकिशोर बोगळे यांनी केले असा गौरव केला. सेवा गौरव कार्यक्रमात प्राचार्य एन बी बोगळे त्यांच्या पत्नी नलिनी बोगळे व आई वडील यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ,पालक, विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य सर्व शिक्षकव शिक्षकेत्तर  कर्मचारी , संचालक रामराव पारवे , केशव पारवे ,मारोती थडवे समाजसेवक मनोहर पारवे, गणपत दुथडे ,  उपस्थीत होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास काळे  यांनी केले सुत्रसंचालन नवनाथ बोबडे तर आभार प्रदर्शन प्रा. महेश पारवे यांनी केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या