💥नाशिकच्या मखमलाबाद परिसरात घरात घुसून दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न...!


💥सुदैवाने दोन मुले आणि एका पुरुष यामध्ये वाचले आहेत आगीमध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान💥

नाशिकमध्ये घरात घुसून दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे नाशिकच्या मखमलाबाद परिसरात ही घटना घडली आहे पंचवटीतील शिंदे नगर येथील भाविक बिलाजियो सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात घुसून एका रिक्षाचालकाने आग लावून दिल्याची घटना घडली आहे. 

यामध्ये भारती गौड आणि सुशिला गौड या दोन बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे भारती गौड आणि सुशिला गौड आपल्या कुटुंबासोबत असताना आरोपी सुखदेव कुमावत हा तिथे पोहोचला आणि त्याचे कुटुंबातील महिलेसोबत वाद झाले यानंतर आरोपीने सोबत आणलेल्या पेट्रोलने दोन्ही महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे सुदैवाने दोन मुले आणि एका पुरुष यामध्ये वाचले आहेत आगीमध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या