💥गंगाखेडमधील व्यापारी गाळ्यांची प्रस्तावीत भाडेवाढ थांबवा....!


🔹कॉंग्रेस कमिटीच्या नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया यांना सूचना 🔹

गंगाखेड : गंगाखेड नगर परिषदेने शहरातील व्यापारी गाळ्यांची २५ टक्के भाडेवाढ प्रस्तावीत केली आहे. तसा ठराव सर्वसाधारण सभेत पारीत करण्यात आला असून या ठरावाची अंमलबजावणी करू नये, अशा स्पष्ट सुचना नगराध्यक्षांसह नगरसेवकांना तालुका कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आल्या आहेत. ही भाडेवाढ थांबवून भाडेवसूलीत सवलत द्यावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी दिलेल्या पत्रातून केली आहे गंगाखेड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा काल दिनांक ५ ऑगस्ट रोजी पार पडली. तीत दोन ठराव ठेवण्यात आले होते. यातील पहिलाच ठराव शहरातील व्यापारी गाळ्यांचे भाडे वाढवणे बाबतचा होता. हा ठराव पारीत करण्यात आला असून अंमलबजावणी बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहीती नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी दिली आहे. 


ही भाडेवाढ तब्बल २५ टक्क्यांपर्यंत शक्य असल्याची चर्चा झाल्याने व्यापारी वर्गात नाराजीची भावना निर्माण झाली आहे. गंगाखेड नगर परिषद हद्दीतील व्यापारी गाळ्यांची भाडेवाढ न करता ऊलट भाडे वसुलीत व्यापाऱ्यांना सवलत देण्यात यावी, अशा स्पष्ट लेखी सुचना कॉंग्रेस कमिटीच्या वतीने नगराध्यक्षांसह कॉंग्रेस नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय ठप्प आहेत. आपल्याच जिल्ह्यातील सेलू सह राज्यातील अनेक नगर परिषदांनी व्यापाऱ्यांना लॉकडाऊन काळातील भाडे माफ केले आहेत. असे असताना ही भाडेवाढ लादणे चूकीचे असल्याचे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी या ठरावाबाबक संदिग्ध भूमिका घेतली आहे. या संदर्भात आगामी काळात योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे तापडिया यांनी म्हटले आहे. तर कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी मात्र कुठल्याही परिस्थितीत ही भाडेवाढ केली जावू नये, असे स्पष्ट केले आहे. हा विषय कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपुडकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला असून वरीष्ठांमार्फतही नगराध्यक्षांसह नगरसेवकांना तशा सूचना देण्यात येणार असल्याचे गोविंद यादव यांनी सांगीतले आहे. या पत्रावर श्री यादव यांचेसह कॉंगेस शहराध्यक्ष शेख युनूस, सुशांत चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या