💥नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पास जिजाऊ सागर नामकरणा साठी मा.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन....!💥जिल्हा प्रशासनाला असे दर्जेदार नाव देण्याचे सौभाग्य आता नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पला देण्याचे लाभत आहे💥

 ✍️ मोहन चौकेकर 

नांदुरा ( ता. १८ ) : नांदुरा तालुक्यातील पूर्णत्वा कडे वाटचाल करणाऱ्या महत्वकांशी व शेतकरी हिताचा प्रकल्प म्हणून जिगाव प्रकल्पा कडे पाहीले जाते आज रोजी अमरावती विभागातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून उदयास येत आहे हा प्रकल्प मातृतिर्थ ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील असल्या मुळे याच्या योग्य अशा नामकरणा करिता ; नांदुरा येथील " राष्ट्रमाता जिजाऊ सेवा प्रतिष्ठाण " , या नावाने एकत्र येऊन ; समविचारी सेवाभावी मंडळी यांनी सखोल विचार करून प्रकल्पास साजेसे असे नाव , "राष्ट्रमाता जिजाऊ सागर " हे व्हावे या करिता संबंधित शासकीय यंत्रणेनेला निवेदनाच्या माध्यमातून परिसरातील बुडीत व लाभीत ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन ; तसेच सर्व पक्षाचे गणमान्य पदाधिकारी व इतर समाजसेवी संस्था यांचे पाठिंबा पत्रक जोडून तयार केलेल्या निवेदनाच्या फाईल आज बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्या प्रसंगी नांदुरा तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील जिजाऊ प्रेमी व आजच्या संविधानावर अत्यंत चांगली निष्ठा असणारे मावळे हजर होते .

मा साहेब जिजाऊ यांनी त्या काळात केलेले सामान्य जनतेचे- शेतकऱ्यांचे हिताची कार्ये पाहता . तसेच त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील असल्या मुळे या प्रकल्पास त्यांचे नाव दिल्यास या प्रकल्पाची नैतिक उंची अनायसेच वाढेल . कारण आज पर्यंत शासनाने असे काही मोठे शासकीय जनहिताचे प्रकल्प - उद्योग ;यांना त्या त्या परिसरातील जन्मलेल्या व जनहितार्थ कर्तबगारी केलेल्या व्यक्तिमत्वाची नावे दिलेली आढळतात . आज बुलडाणा जिल्ह्याची जगभरात असलेली ओळख ही केवळ आणि केवळ , राजमाता मॉ साहेब जिजाऊं मुळे मिळालेली आहे . तेव्हा नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्प हा बुलडाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर शासनाच्या महसुली विभाग अमरावती क्षेत्रातील एक मोठा व महत्वाकांशी प्रकल्प आहे .

अश्या या मोठ्या प्रकल्पास स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊं चे नाव दिल्यास , तसेच तेथे वनराई बगीचा व मा साहेबांचा पुतळा उभारून काही निवासी सदन-सदनीका बांधल्यास ; या प्रकल्पाची नैतिक उंची वाढेल . असे झाल्यास येथे पर्यटन स्थळ तयार होईल .

केव्हा तरी बुलढाणा व खामगाव हे दोन वेगवेगळे जिल्हे होणार आहेतच . आज बुलढाणा जिल्ह्यात असल्या मुळे घाटा खालील लोकांना सुद्धा मातृतीर्थ जिल्हा ही ओळख जोडलेली आहे . परंतु जिल्ह्याचे विभाजन झाल्या नंतर नविन जिल्ह्या साठी ही ओळख पुसली जाईल . तेव्हा जिगाव प्रकल्पास , 'राष्ट्रमाता जिजाऊ सागर ' हे नामकरण झाल्यास व पर्यटन स्थळ तयार केल्यास ; घाटा खालील नवीन जिल्ह्याची सुद्धा ती ओळख टिकून राहण्यास मदतच होईल . तसेच पिढ्यानपिढ्या वाहिलेली जमीन पाण्या खाली बुडून सुद्धा असे सकारात्मक ऊर्जा देणारे नाव या प्रकल्पास दिल्यास , बुडित क्षेत्रातील लोकांना पुन्हा नव्याने त्यांचे संसार थाटण्या करता मा साहेब जिजाऊ या नावाने एक प्रकारे बळ मिळेल- ऊर्जा मिळेल .

एवढे जागतिक दर्जाचे नाव असलेल्या जिजाऊ साहेब यांचे नावाने पुर्ण बुलढाणा जिल्ह्यात आज पर्यंत एकाही उपक्रमास -स्थळास त्यांचे नामकरण झालेले नाही ! ज्यांच्या मुळे या जिल्ह्याची ओळख आहे . त्या जिल्हा प्रशासनाला असे दर्जेदार नाव देण्याचे सौभाग्य आता नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पला देण्याचे लाभत आहे . तेव्हा शासनाने या जिल्ह्यातील तमाम रयतेच्या शक्तिच्या -उर्जेच्या या नावाची निवड करून मातृतिर्थ जिल्हा या उपाधीस उपकृत करुन सुर्वणसंधी चा व ऐतिहासिक निर्णयाचे मानकरी ठरण्याचा लाभ घ्यावा...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या