💥गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न...!


💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीत करण्यात आले होते रक्तदान शिबीराचे आयोजन💥

पुर्णा ; पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन तालुक्यांचा समावेश असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे काका ह्यांच्या वाढदिवसानिमित्त पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले या रक्तदान शिबीरात ३५ ते ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले, रक्तदान ही काळाची गरज ओळखून पूर्ण गावकऱ्यांनी ह्या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला, हे शिबीर पूर्ण करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी बापूराव डुक्करे पाटील  तालुका उपाध्यक्ष गुट्टे काका मित्र मंडळ व त्यांच्या मित्र परिवाराने खूप मेहनत घेतली व रक्तदान शिबीर यशस्वी केले, बापूराव डुक्करे पाटील  ह्यांनी आयोजित केले रक्तदान शिबीराची त्यांच्या ह्या सामाजिक उपक्रमची  तालुक्यात चर्चा होतं आहे, दिवसभर पार पडलेल्या रक्तदान शिबिराचे प्रमाणपत्र वाटप हे आमदार गुट्टे साहेब ह्यांच्या हस्ते झाले, आयोजित कार्यक्रमची सूत्र संचलन व आभार प्रदर्शन प्रा.सैनाजी माठे सर ह्यांनी केले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या