💥समृद्धी महामार्गाच्या टिप्परला भीषण अपघात परप्रांतीय १३ मजुरांचा मृत्यु ३ गंभीर जखमी.....!


💥भिषण अपघाताने विदर्भात हाहाकारसिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव समृद्धी कॅम्पच्सा जवळ झाला हा अपघात💥

 ✍️ मोहन चौकेकर 

बुलडाणा : समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेले मजूर कामावर चालले होते मात्र पावसाची रिपरिप सुरू असल्याने काम बंद असल्याचा निराेप मजुरांना मिळाला मिळाला त्यामुळे कामावर गेलेले 15 मजूर टिप्पर मध्ये बसून परत आपल्या तात्‍पुरत्‍या निवासस्‍थानांकडे निघाले मात्र परत फिरणे शेवटचे असेल असे कुणालाच वाटले नाही तशी कुणालाही तिळमात्र शंका आली नसेल मात्र अचानक काळाने घाला घातला समोरून येणाऱ्या एसटी बसला वाचवताना टिप्पर रस्‍त्‍याच्‍या कडेला पलटी झाले. लोखंडी सळ्या आणि सिमेंट असल्याने यात बसलेले 15 मधुरा पैकी १३ मजूर जागीच दबून ठार झाले झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. मात्र नशीब बलवत्तर म्हणून चालकासोबत केबिनमध्ये बसलेली १२ वर्षीय मुलगी वाचली . अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना तढेगाव फाट्यापासून अर्ध्या किलोमीटरवर देऊळगाव मही (ता. सिंदखेड राजा) रोडवर आज, २० ऑगस्‍टला दुपारी १२ च्‍या सुमारास घडली.

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या कामावरील मजुरांसाठी तढेगाव (ता. सिंदखेड राजा) येथे येथे समृद्धी बेस कॅम्प आहे. या कॅम्पवर जवळपास ३०० हून अधिक मजूर कुटुंबासह राहतात. हे मजूर बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व इतर राज्यांतील आहेत. सकाळी दहाच्‍या सुमारास टिप्पर (क्र. एमएच ११ एएल ३७२०) १५ मजूर घेऊन त्यात लोखंडी सळई व सिमेंट घेऊन समृद्धी महामार्गाच्या कामावर गेले होते. परंतु पाऊस आल्यामुळे काम बंद असल्याचे कळाले आणि मजूर दुपारी १२ च्‍या सुमारास कामावरून परत कॅम्पवर याच टिप्परने सोबत आणलेले जेवणाचे डबे घेऊन तसेच परत फिरले. राहेरी पूल बंद असल्याने वाहतूक तढेगाव- देऊळगाव मही या मार्गाने वळविण्यात आली आहे. मात्र हा रस्‍ता एकतर्फा आहे. त्‍यातच पावसाची रिपरिप सुरू असल्याने बाजूचा भाग निसरडा झाला आहे.तडेगाव फाट्यापासून अर्ध्या किलोमीटरवर विरुद्ध दिशेने एसटी बस आल्याने तिला रस्ता देण्याच्‍या नादात टिप्पर रस्‍त्‍याखाली आले आणि पावसामुळे निरसडा झालेल्या रस्‍त्‍यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. अपघात एवढा भीषण होता की १२ वर्षीय छब्‍बू नावाची केबिनमध्ये बसलेली मुलगी आणि टिप्परमध्ये मागे बसलेले दोघे बाहेर फेकले गेले. मात्र मागेच बसलेले अन्य १३ मजूर सळयाखाली दबले. सर्व मजुरांना जालना येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्‍यातील १३ जणांचा पूर्वीच मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. एका मजुराला जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

.

चिमुकली छब्‍बूला साधे खरचटलेही नाही. मात्र तिने या अपघातात पितृछत्र गमावले आहे. मृतकांत तिचे वडीलही आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सोमनाथ पवार, जमादार अशोक चाटे यांच्‍यासह पोलिसांनी घटनास्‍थळी पोहोचून मजुरांना रुग्‍णालयात हलवले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मृत मजुरांना श्रद्धांजली वाहिली असून, कुटुंबियांच्‍या दुःखात सहभागी असल्याचे म्‍हटले आहे.

मृतकांची नावे…

गणेश डावर (20, रा. मेलखेडी जि.खरगोण)

गोविंद शिलोड (25, रा. भोंडल जि. धार)

नारायण डावर (25, मेलखेडी जि. खरगोण)

करण मकवणे (19, काकलपूर जि.धार)

दीपक डावर (21, मेलखेडी जि.खरगोण)

सुनील डावर (22, मेलखेडी जि.खरगोण)

दिनेश गावड (२७, हनुमत्या जि.धार)

जितेन मकवणे (19, मकशी जि.खरगोण)

दिलीप कटारे (25, अंबापूर जि.धार)

मिथुन माचारे (19, तारापूर जि.धार)

लक्ष्मण डावर (20, मोहिदा जि. खरगोण)

महेश कटारे (31, बाबलाई जि.खरगोण)

देवराम ओसरे (21, कचिकुवा जि.खरगोण)

मृतक सर्व मजूर मध्यप्रदेशातील आहेत

राहेरी पुलावरून वाहतूक सुरू असती तर कदाचित अपघात टळला असताना गपूर औरंगाबाद महामार्गावर असलेला राहेरी चा ये पूल खराब झाल्याने ट्रक बसेस टिप्पर आधी जड वाहनांची वाहतूक तढेगाव देऊळगााव मही मार्गे वळविण्यात आली आहे त्यामुळे दुसरबीड पासून औरंगाबाद कडे जाणाऱ्या बसेस तढेगाव मार्गे जातात संपूर्ण् जडवाहतूक या मार्गावरन बंद आहे मात्र असे असताना राजरोसपणे ट्रक आणि इतर जड वाहने सर्रास पुलावरून जातात असे असताना केवळ बसेत तढेगाव मार्गे जातात इतर वाहने या पुलावरून सुरू असताना केवळ बसची ऍलर्जी या पुलाला आहे का असा संतप्त प्रश्न अनेकदा सर्वांनाच पडतो वास्तविक तढेगाव मार्गे हा खूपच अरुंद आहे आणि त्यातच समृद्धी महामार्गाचे कामे या रस्त्यावर सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी कामासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते या कामासाठी कामावरचे मजूर घेऊन टिप्पर त्यांच्या निवासस्थानाकडे परत जात असताना समोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा टिप्परचा ताबा सुटला आणि पाऊस पडल्यामुळेे रस्ता चिकचिक चिखलमय झाला होता त्यामुळे टिप्पर पलटी झाल आणू दुर्दैवाने हा भीषण अपघात झाला जर कदाचित समोरून बस अली नसती तर हा अपघात झाला नसता अशी नागरिकांमध्ये चर्चा होती.  


✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या