💥सावधान : वाशिम जिल्हा तापाने फणफणतोय,माञ आरोग्य यंञणा सुस्तच धूरफवारणी करुन घरोघरी रूग्नतपासणी करावी...!


💥खाजगी दवाखान्यातील वारेमाफ फी वर प्रशासनाने अंकुश लावण्याची मागणी💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम/मंगरूळपीर:-संपुर्ण वाशिम जिल्ह्यात डेंग्युसंदृश्य,टायफाईड,मलेरिया आदी आजारांचे रूग्न झपाट्याने वाढत असुन आरोग्य विभागाला याचे काही घेणेदेणे नसल्याचे चीञ आहे परंतु दुसरीकडे माञ खाजगी दवाखानेवाले आणी रक्त तपासणी लॅबवाल्याचे चांगभले होतांना दिसत आहे.सव्वाच्या सव्वा दर आकारुन खाजगी रूग्नालयात गोरगरीबांना ऊपचार घेण्यास भाग पडत आहे.वरिष्ठ प्रशासनाने याप्रकरणी दखल घेवून सरकारी आरोग्य यंञणा रूग्नांसाठी सज्ज ठेवण्याची मागणी होत आहे.

           जिल्हावाशी विविध आजाराच्या तापाने फणफणत असुन सरकारी यंञणा या आजारावर नियंञण मिळवण्यासाठी तोकडी पडत आहे का हा प्रश्न सध्या ऊद्भवत आहे.डेंग्यु,मलेरिया,टायफाईड आणी इतर काही आजाराकरीता रूग्नांना रक्ततपासणीचे सल्ले देत असल्याने सरकारी दवाखान्यात मिळालेल्या माहीतीनूसार एकच किट तीनचार जनांना रक्ततपासणीसाठी वापरत असल्याने पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही त्यामुळे साहजीकच रूग्न खाजगी लॅबवाल्याकडे आकर्षित होतात.खाजगी रक्त तपासणीवाले 'शिकार आली' या अवीर्भावात अव्वाच्या सव्वा वारेमाप बिल आकारुन रक्त तपासुन देत असल्याची खंत काही रूग्नांनी बोलुन दाखवली.आरोग्यासाठी कोणीही रूग्न पैशाकडे पाहत नसल्याचाच फायदा खाजगीवाले घेत असल्याने चहुबाजुंनी रूग्नांची पिळवणूक होत आहे.

एकीकडे शहरात आणी ग्राणीमभागातही आजाराने आपले पाय पसरल्याने या आजारावर नियंञण मिळवन्याठी धुर फवारणी,घरोघरी रूग्नतपासणी आणी संशयित रूग्नांचे रक्तनमुने घेवुन त्यांना सरकारी इलाज वेळेत मिळवून देणे गरजेचे बनले आहे.आधी ग्रामीण भागात आरोग्यसेवक अशा साथीच्या आजाराच्यावेळी घरोघरी जावुन रूग्नतपासणी करीत होते माञ आता ही मोहीम फक्त कागदावरच राबवली जाते की काय?अशा संशय व्यक्त होत आहे.शहरातली नगरपरिषदेकडुन प्रत्येक वार्डात धूरफवारणी करून घरोघरी आरोग्य यंञणेने जावुन आरोग्य तपासणी करावी आणी रूग्नांना वेळेत मोफत ऊपचार ऊपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जनतेमधुन होत आहे.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या