💥लॉयन्स च्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद.....!


💥शिबिरामध्ये जवळपास 100 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली💥 


 गंगाखेड (प्रतिनिधी) लॉयन्स क्लब गंगाखेड टाउन व  लॉयन्स नेत्र रुग्णालय सिडको नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गीता मंडळ या ठिकाणी दिनांक 25 ऑगस्ट बुधवार रोजी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले . या शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यासपीठावर डॉ. हेमंत मुंडे ,रमेश औसेकर, गोविंदा आय्या, संतोष तापडिया, डॉ.रितेश वट्टमवार, मुंजाजी चोरघडे, संजय सुपेकर, प्रकाश घण, लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल गंजेवार, सचिव गोविंद रोडे, कोषाध्यक्ष महादेव गीते, क्लब सर्विस चेअर पर्सन गोपाळ मंत्री ,बुलेटिन एडिटर भगत सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


या शिबिरामध्ये जवळपास 100 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली व यापैकी 30 पात्र रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया  शिबिरासाठी निवडण्यात आले या रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन नांदेड येथील लायन्स नेत्र रुग्णालयात करण्यात येणार असून त्यांचे ऑपरेशन, राहण्याची सोय, जेवणाची व्यवस्था, डोळ्याच्या लेन्स, काळा चष्मा या सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत .तसेच ऑपरेशन साठी जाण्याची व्यवस्था लॉयन्स च्या  गाडीतून केली जाणार आहे .यासाठी रुग्णांना सोबत आधार कार्ड व असल्यास पिवळे रेशन कार्ड सोबत ठेवणे जरुरी आहे. रुग्णांच्या नेत्र तपासणी साठी नांदेडच्या त्रिमुख क्षीरसागर, योगेश कदम, संदीप पवार या तंत्र सहाय्यकानी मदत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅबिनेट ऑफिसर  केशव देशमुख, प्रा. बालाजी ढाकणे, रामेश्वर तापडिया, संभाजी वाडेवाले, आदिनाथ मुंडे, हरिश्चंद्र राठोड, अभिनय नळदकर ,अंगद बंगाळ, जगन्नाथ आंधळे, मोहन गीते, अरुण मुंढे, उमेश पापडू, तुषार उपाध्याय, संजय तापडिया, विजय जाधव आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशांत फड तर आभार प्रदर्शन मोहन गीते यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या