💥आपण केलेल्या समाजोपयोगी कार्यावर आपल्या कर्तृत्वातून ओळख निर्माण होते -- डॉ.यु.एन.आळसे


💥पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप च्या वतीने सत्कार समारंभ संपन्न💥

धानोरा काळे/प्रतिनिधी

आपण कोणत्या कुटुंबात जन्मलो अथवा आपले नाव काय आहे यावर समाजात ओळख तयार होत नसून ती आपण केलेल्या समाजोपयोगी कार्यावर व आपल्या कर्तृत्वातून निर्माण होते असे प्रतिपादन व.ना.म.कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.यु.एन.आळसे यांनी केले.


दि.२७ ऑगस्ट रोजी पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप च्या वतीने मजलापुर येथे डॉ.आळसे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केलेल्या विशेष कार्या बद्दल सपत्नीक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिभूषण सोपानराव अवचार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गजानन गडदे , अॅड. रमेश गोळेगावकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव भोसले यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना डॉ.आळसे म्हणाले की, जीवनामध्ये गरजेपुरता पैसा आवश्यक असून पैशाच्या मागे न लागता प्रत्येकाने आपले कर्तुत्व आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून करण्याची आवश्यकता आहे. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सेवा देत असताना आपण शेतकरी हा घटक केंद्रीभूत मानून काम करत राहिलो त्यामधून अनेक शेतकरी आपल्यासी जोडले गेले. व कामांमध्ये आनंद निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना भावनिक होत त्यांनी जीवनामध्ये केलेला खडतर शैक्षणिक प्रवास, पत्नी व कुटुंबाची मिळालेली साथ उलगडून सांगत असताना क्षणभर उपस्थितांना डोळ्यातील अश्रू आवरता आले नाही.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत मोतीराम महाराज यांच्या प्रतिमेचे अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप च्या वतीने डॉ.आळसे व संतोष आळसे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आत्मा चे प्रकल्प संचालक संतोष आळसे, डॉ. गजानन गडदे, अॅड. गोळेगावकर, भोसले आदींची समयोचित भाषणे झाली. अध्यक्षीय समारोप सोपानराव अवचार यांनी केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप श्रृंगारपुतळे यांनी केले तर सूत्रसंचालन व्यंकटेश जाधव यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार माधव आवरगंड यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजक बालासाहेब हिंगे, शेती सेवा ग्रुप चे मधुकरराव जोगदंड, उद्यान पंडित प्रताप काळे, गोविंदराव दुधाटे, रमेश पवार, पांडुरंग शिंदे, विक्रम आवरगंड सुदाम आबा दुधाटे, मोतीराम पौळ,शिवराज सूर्यवंशी , शिवबाबा शिंदे,आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमास मजलापुर येथील सरपंच काशिनाथराव जाधव, सुभाषराव हिंगे, ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामेश्वर हिंगे, अच्युतराव जाधव, माली पाटील सदाशिव जाधव, त्रिंबकराव हिंगे आदींसह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकरी व शेती सेवा ग्रुपचे सदस्यांसह महीलांची मोठी उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या